घरमुंबईउद्धव ठाकरेंच्या झेड प्लस सिक्युरिटीचे गूढ !

उद्धव ठाकरेंच्या झेड प्लस सिक्युरिटीचे गूढ !

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यावेळी कोणतेही राजकीय पद नसताना बाळासाहेबांना ‘झेड प्लस’ सिक्युरिटी देण्यात आली होती. नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘झेड प्लस’ सिक्युरिटी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या जीवाला कोणापासून धोका आहे, ही माहिती मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या अधूनमधून प्रसारमाध्यमांतून येत असतात. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यावेळी कोणतेही राजकीय पद नसताना बाळासाहेबांना ‘झेड प्लस’ सिक्युरिटी देण्यात आली होती. नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘झेड प्लस’ सिक्युरिटी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या जीवाला कोणापासून धोका आहे, ही माहिती मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची माहिती सार्वत्रिक करीत असताना पक्षप्रमुखांची माहिती का लपवून ठेवली जाते असा सवाल विचारला जात आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनाही उद्धव यांच्या ‘झेड प्लस’ सिक्युरिटीचे गूढ उलगडलेले नाही. राज्य गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेते असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही कुचराई करायची नसल्याने त्यांना ‘झेड प्लस’सुरक्षा देण्यात आली. एप्रिल महिन्यातच उद्धव ठाकरेंच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेत वाढ करून त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा दिली.

- Advertisement -

मातोश्रीवरूनच सेक्युरिटीची सूत्र हलली!

पक्षप्रमुखांना ‘झेड प्लस’ सुरक्षा मिळावी म्हणून खासदार विनायक राऊत आणि खासदार अनिल देसाई यांनी गृहविभागाला पत्र लिहिले होते. दोन्ही खासदार ‘झेड प्लस’ सिक्युरिटीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटलेही होते. मात्र ‘हो जायेगा, मै सीएमसे बात करता हूँ’ एवढ्यावरच त्यांची बोळवण झाली. मात्र ‘झेड प्लस’साठी मातोश्रीवरूनच सूत्रे हलली आणि वर्षावरून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच उद्धव यांच्या सुरक्षेला ‘झेड प्लस’चा स्टेट्स मिळाला.

‘हो जायेगा, मै सीएमसे बात करता हूँ’

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची माहिती सार्वत्रिक करीत असताना पक्षप्रमुखांची माहिती का लपवून ठेवली जाते असा सवाल विचारला जात आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनाही उद्धव यांच्या ‘झेड प्लस’ सिक्युरिटीचे गूढ उलगडलेले नाही. राज्य गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेते असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही कुचराई करायची नसल्याने त्यांना ‘झेड प्लस’सुरक्षा देण्यात आली.
एप्रिल महिन्यातच उद्धव ठाकरेंच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेत वाढ करून त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा दिली. पक्षप्रमुखांना ‘झेड प्लस’ सुरक्षा मिळावी म्हणून खासदार विनायक राऊत आणि खासदार अनिल देसाई यांनी गृहविभागाला पत्र लिहिले होते. दोन्ही खासदार ‘झेड प्लस’ सिक्युरिटीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटलेही होते. मात्र ‘हो जायेगा, मै सीएमसे बात करता हूँ’ एवढ्यावरच त्यांची बोळवण झाली. मात्र ‘झेड प्लस’साठी मातोश्रीवरूनच सूत्रे हलली आणि वर्षावरून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच उद्धव यांच्या सुरक्षेला ‘झेड प्लस’चा स्टेट्स मिळाला

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही होती ‘झेड प्लस’ सुरक्षा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दहशतवाद्यांपासून धोका असल्यामुळे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) ‘झेड प्लस’ सुरक्षाकवच होते. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एस्कॉर्टसाठी एक अधिकारी, एके ४७ सह तीन शस्त्रधारी पोलीस कर्मचारी २४ तास त्यांच्या सुरक्षेसाठी असायचे. बाळासाहेबांसाठी एक बुलेट प्रूफ कार, एक जामर गाडी आणि एक ट्रॅफिक पायलट कार देण्यात आली होती. देशात कोणतेही राजकीय पद नसताना केवळ शिवसेनाप्रमुखांना तीन दशके ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली होती हे विशेष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -