घरमुंबईपर्जन्य जल विभागाच्या मुख्य अभियंत्यांना शिवसैनिकांची मारहाण!

पर्जन्य जल विभागाच्या मुख्य अभियंत्यांना शिवसैनिकांची मारहाण!

Subscribe

पाणी तुंबल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेना कार्यकर्त्यांनी पालिका अभियंत्यालाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पालिकेत घडला.

पर्जन्य जलवाहिनी विभागाचे मुख्य अभियंता विद्याधर खंडकर यांना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यावेळी महापौरांनीही त्यांच्यावर हात उगरल्याचा आरोप होत आहे. कलानगर नाला बंद केल्यामुळे या भागात पाणी तुंबले होते. याकडे खुद्द शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी महापौरांचे लक्ष वेधले. त्यामुळे महापौरांनी ६ जूनला नाल्याची पाहणी केली होती. पण येथे कोणतेच काम झाले नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी महापौरांनी नाल्याची पुन्हा पाहणी केली. काम न झाल्याबद्दल त्यांनी जाब विचारला. परंतु खंडकर यांनी उद्धट भाषा वापरत, हातवारे केले. त्यामुळे उपस्थित शिवसैनिकांनी खंडकर यांना शिविगाळ करत बेदम मारहाण केली. याप्रकरणी अभियंत्यांनी आयुकांची भेट घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

महापौरांनी मात्र फेटाळलं वृत्त!

मी कलानगर नाल्याची दुपारी पाहणी केली आणि नाल्याचे किती बांधकाम पूर्ण झाले याची माहिती घेतली. त्यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पण त्यावेळी कोणतीही मारहाण अथवा धक्काबुक्की झाली नव्हती. अधिकारी असे का आरोप करत आहेत, याबाबत मला कल्पना नाही.

विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -