घरमुंबईग्रामीण भागात एक लाखांवर सेनेच्या शाखाप्रमुखांची नियुक्ती

ग्रामीण भागात एक लाखांवर सेनेच्या शाखाप्रमुखांची नियुक्ती

Subscribe

१४ ते २७ जुलै दरम्यान ग्रामीण भागात शिवसेना सदस्य नोंदणीचे अभियान राबविले जाणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत संपुर्ण राज्याच्या लहान भागांमध्ये अर्थात ग्रामीण भागात एक लाख शाखाप्रमुख नेमले जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा प्रचार-प्रसार व्हावा तसेच आगामी विधानसभेच्या तयारीकरिता शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या पुर्वतयारीकरिता कार्यक्रम

मागील पाच वर्षात आलेले अनुभव पाहता येणाऱ्या निवडणुकीच्या पुर्वतयारीकरिता असा उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांनी शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिनाच्या दिवशी ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ ही संकल्पना विशद करून आपल्या प्रास्ताविकातून म्हटले आह.

१४ ते २७ जुलै दरम्यान नोंदणी अभियान 

या शिवसेनेच्या शाखाप्रमुखांच्या नेमणुकीची प्रक्रिया २७ जुलैच्या आत पुर्ण केली जाणार असून नव्या शाखाप्रमुखांची ओळखपत्र देखील तयार करण्यात येणार आहे. १४ ते २७ जुलै दरम्यान ग्रामीण भागात शिवसेना सदस्य नोंदणीचे अभियान राबविले जाणार आहे.

असे असणार अभियानाचे स्वरूप

  • महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये शिवसैनिक नोंदणी करण्यात येणार आहे.
  • प्रत्येक ग्रामपंचायतील प्रभागात पुरूष तसेच महिला शाखाप्रमुख नेमले जाणार आहे.
  • ग्रामपंचाय़तीच्या प्रत्येक वॉर्डात एका उपशाखा प्रमुखांची नेमणुक करण्यात येईल.
  • नेमणुक करण्यापुर्वी शिवसैनिकांकडून शिवसैनिक नोंदणी अर्ज भरून घेतला जाणार आहे
  • शाखाप्रमुख तसेच शाखा संघटक पदांवर ज्या शिवसैनिकांची नियुक्ती केली जाईल, त्यांचा छायाचित्रासह असणारा नोंदणी अर्ज १ ते ७ जुलैपर्यंत शिवसेना भवन येथे जमा करण्यात येणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -