घरमहाराष्ट्रनाशिकआरोग्य विद्यापीठात पुढील वर्षापासून पदवी योग

आरोग्य विद्यापीठात पुढील वर्षापासून पदवी योग

Subscribe

योगशास्त्राचे जगभरातील वाढते महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढील वर्षापासून ’बॅचलर इन योगा अँड नॅचरोपॅथी हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

योगशास्त्राचे जगभरातील वाढते महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढील वर्षापासून ’बॅचलर इन योगा अँड नॅचरोपॅथी हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना बारावीनंतर पदवीसाठी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्ससोबतच योगशास्त्रातही पदवीचे शिक्षण घेण्याचा पर्याय मिळणार आहे.

आरोग्याप्रती सजगता निर्माण होऊन, निरामय राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी योगाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. योगाविषयाचे शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने योग विषयात पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ’बॅचलर इन योगा अँड नॅचरोपॅथी या चार वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. हा पदवी अभ्यासक्रम शिकवण्याची इच्छा दर्शवणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयांनी व खासगी शिक्षण संस्थांनी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम महाराष्ट्रात सर्वत्र सुरू होणार आहे. चार वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी एका महाविद्यालयात 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यांचे शैक्षणिक शुल्क मर्यादित राहणार असून, शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फेलोशिप देण्याचा विचार विद्यापीठाने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स व सायन्य या विद्याशाखांसोबतच योगा विषयाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल. योगा विषयासाठी आवश्यक तज्ञ शिक्षक व प्रशिक्षकांच्या नियुक्तीसाठी कोणते नियम व निकष आवश्यक आहेत, याविषयी लवकरच नियमावली तयार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

१० विद्यार्थ्यांना फेलोशिप

आरोग्य विद्यापीठातर्फे चालवण्यात येणार्‍या योग पदविका (एक वर्ष) अभ्यासक्रमाच्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची फेलोशिप देण्यात येते. दोन वर्षापासून हा अभ्यासक्रम चालवण्यात येत असून, ४० विद्यार्थ्यांनी या फेलोशिपचा लाभ घेतला आहे. आरोग्य विद्यापीठात व योग विज्ञान विद्यापीठात योग केंद्र सुरू आहेत.

शिक्षण संस्थांकडून मागवले प्रस्ताव

योगाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याविषयी सजगता वाढावी या उद्देशाने आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २०२० पासून ’योगा अँड नॅचरोपॅथी हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालये व शिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. – डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -