घरमुंबईदेवेंद्रजी, दादा म्हणाले आता इकडे तिकडे जायचं नाही - बाळासाहेब सानप

देवेंद्रजी, दादा म्हणाले आता इकडे तिकडे जायचं नाही – बाळासाहेब सानप

Subscribe

नाशिकमध्ये भाजपचे माजी आमदार आणि शहर अध्यक्ष राहिलेल्या बाळासाहेब सानप यांनी आज भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घरवापसी केली. बाळासाहेब सानप यांनी याआधी विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत भाजपला रामराम ठोकला होता. ”गेले अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे काम केलेल्या माणसाला दुसरीकडे गेल्यावर चुकल्यासारखे वाटते हीच अवस्था माझीही झाली होती. पण स्वतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की आता दुसरीकडे कुठेही जायच नाही. त्यामुळेच मी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला,” असे बाळासाहेब सानप यांनी भाजप प्रवेशानंतर स्पष्ट केले.

बाळासाहेब सानप यांनी गेल्या ३५ वर्षे संघ परिवारात अतिशय जोमाने काम केले असल्याचे कौतुक भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले. मधल्या काळात निवडणूका झाल्या त्यावेळी काही कारणाने ते पक्षाबाहेर पडले. पण परिवाराची खासीयत अशी आहे की सोडून गेलेलेही परत आल्याशिवाय राहत नाही. याआधीही सानप यांनी अतिशय जोमाने काम करत त्यांच्या नेतृत्वात ६७ नगरसेवक निवडून आले. आम्ही ते आमदार असताना त्यांच्या नेतृत्वात बहुतांश जागा जिंकलो असेही सानप म्हणाले.

- Advertisement -

आपलेच असलेले सानप छोट्या काळाकरिता दुरावलेले होते, आता ते सानप हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नाशिकमध्ये भाजपच्या वाटचालीत जडणघडणीत यशामध्ये काही लोकांचे परिश्रम आहेत, त्यापैकी बाळासाहेब सानप एक आहेत. मधल्या काळात काही समज गैरसमज अंतर तयार झाले. काही काळ सानप आमच्यात नव्हते, असे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मी स्वतः दादांसोबत चर्चा केली आणि समज गैरसमज दूर केले पाहिजे. ज्याच्या मनात पक्ष, त्याला आपल्यासोबत घेतल पाहिजे. त्यांच्या मनात भाजपच होत. त्यामुळे वाटाघाटी कराव्या लागल्या नाही. मला भाजपचेच काम करायचे आहे सांगत त्यांनी अवघ्या १० मिनिटात पक्ष प्रवेशाचा निर्णय केला.

मागचे ३५ वर्षे बाळासाहेब भाजपमध्ये आहेत. पुढचे ३५ वर्षेही भाजपमध्येच राहतील. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या चंद्रकांत दादा देतील, त्या कराव्यात. कुंभमेळ्यात गिरीश भाऊंच्या मदतीला बाळासाहेब आलेत ही आठवणदेखील त्यांनी करून दिली. बाळासाहेबांकडे खरोखर जमीनीशी जोडलेला नेता म्हणून बघतो. आता बाळासाहेबांच्या येण्यामुळे नवीन चैतन्य येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

भाजपमध्ये येत्या दिवसात अनेक लोकांचे प्रवेश होणार आहेत. काही लोक उगाच आपल्या पक्षात लोक येणार असे सांगत वावड्या उठवतात, असे सांगत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. कोणीगी त्यांच्याकडे जाणार नाही त्यांनाही माहिती आहे असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या पक्षात अस्वस्थता आहे. हे आमदार काय करतील याचा भरवसा त्यांना नसल्यानेच असे संकेत देण्यासाठी विधाने केली जात आहेत. ते पुंग्या सोडतात, पुंग्या काही माध्यमे वाजवतात अशा शब्दात त्यांनी टीका केली. एखादे धोक्याने आलेले सरकार किती काळ चालत ? म्हणून भाजपच मजबूत होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकत्र लढल्याने तीन पक्षांना फायदा होईल, असा दावा केला जात असला तरीही ती जागा भाजप व्यापणार आहे, असेही ते म्हणाले. आपल्याला तीन पक्षांनी संधी दिली आहे. राजकीय पोकळी व्यापून स्वतःच्या भरवशावर सत्तेत येण्याची ही संधी आहे. एकट्याच्या भरवशावर सत्ता आणणारा पक्ष म्हणून भाजपची क्षमता आहे. देशात सगळ्या निवडणुकात केरळ ते बंगाल, जम्मू पासून हैद्राबादपर्यंत सगळीकडे भाजप आहे. येत्या काळात चांगली लोक येणार, योग्य जबाबदाऱ्या देणार, पक्ष मजबूत करू. आपलेच असलेले बाळासाहेब काही काळाकरिता दूर झाले होते. पण परिवारातला माणूस परिवारात राहतो अशा शब्दात त्यांनी बाळासाहेबांचे स्वागत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -