Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई श्रावणी जाधव एलीफंन्टा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत पार करणार सागरी अंतर

श्रावणी जाधव एलीफंन्टा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत पार करणार सागरी अंतर

Related Story

- Advertisement -

कोरोनात काळात कोरोना योध्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान करण्यासाठी कल्याण मधील ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटु श्रावणी संतोष जाधव (14) ही एलीफंन्टा ते गेटवे ऑफ इंडिया हे 14 किमीचे सागरी अंतर सर करणार आहे. कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस, वॉडबॉर्ड, स्मशानभुमीतील कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, शासकीय सेवेतील सर्वच कर्मचारी आणि अधिकारी यांनी उल्लेखन्नीय काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक शब्दाने करता न येण्यासारखे आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मान करण्यासाठी श्रावणी जाधव हीने येत्या 21 फेब्रुवारी 2021 रोजी एलिफन्टा ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किमीचे सागर अंतर कापण्याचा निर्धार केला आहे. श्रावणी ही ठाणे  जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटु असून तीच्या या उपक्रमास स्विमींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -