घरमुंबईShrikant Shinde यांच्या उमेदवारीमुळेच पक्षाला एक जागा जिंकता आली - CM Eknath...

Shrikant Shinde यांच्या उमेदवारीमुळेच पक्षाला एक जागा जिंकता आली – CM Eknath Shinde

Subscribe

मुंबईत डीप क्लिन ड्राईव्ह उपक्रम राबवत आहोत. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना क्लिन स्वीप करून टाकेल, अशी त्यांना धास्ती वाटत आहे", अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केले आहेत.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतील. रामदास कदम यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. तेव्हा पक्षाला उच्चशिक्षित असलेला तरुण उमेदवार हवा होता. श्रीकांत शिंदेमुळे पक्षाला लोकसभेची एक जागा मिळाली, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदेला तिकीट देणे चुकी असल्याचे विधान करणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिले.

कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदेला उमेदवारी देणे ही मोठी चूक झाली, असे उद्धव ठाकरेंनी कल्याण दौऱ्यात म्हटले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “त्यावेळी पक्षालाच गरज होती. पक्षाला उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा हवा होता. उलट श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीमुळे पक्षाला लोकसभेची एक जागा मिळाली”, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Milind Deora यांच्या राजीनाम्यावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया, म्हणाले – “काँग्रेसने…”

ठाकरेंनी घरात बसून राज्य मागे टाकले

उद्धव ठाकरेवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, “तुम्ही घरात बसून महाराष्ट्र 10 वर्ष मागे टाकले. त्यामुळे आम्ही तुमची सरकार घालवली. मागे गेलेले राज्य आज पुढे जात आहे. बंद पडलेले प्रकल्प आम्ही पुढे घेऊन जात आहोत. समृद्धी महामार्ग, शिवडी-न्हावा शेवा यासारखे प्रकल्प तुम्ही अहंकारामुळे बंद केले होते. स्वत:च्या अहंकारासाठी राज्याला मागे टाकणे. राज्यातील जनतेचे नुकसान करणे, है दुर्दैवी आहे”, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी केला आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – सर्वात तरुण खासदार बनून राजकारणात छाप पाडणारे Milind Deora आहेत कोण?

आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरला आणि हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष करा आणि निवडणुका लढवा, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. तोच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. सत्तेत येण्यासाठी ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. आता मुंबईत डीप क्लिन ड्राईव्ह उपक्रम राबवत आहोत. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना क्लिन स्वीप करून टाकेल, अशी त्यांना धास्ती वाटत आहे. त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -