घरमहाराष्ट्रसर्वात तरुण खासदार बनून राजकारणात छाप पाडणारे Milind Deora आहेत कोण?

सर्वात तरुण खासदार बनून राजकारणात छाप पाडणारे Milind Deora आहेत कोण?

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केल्याने नाराज झालेल्या मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोबत असलेले 55 वर्षांचे नाते आता संपुष्टात आणले आहे.

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्यामुळे आज (ता. 14 जानेवारी) काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. देवरा यांनी पक्षाला रामराम केला असला तरी ते लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दुपारी 2 वाजता हा पक्षप्रवेश होणार असून मिलिंद देवरा हे एकटेच प्रवेश करणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. देवरा यांच्यासोबत काँग्रेसचे 10 माजी नगरसेवक, 20 ते 25 पदाधिकारी, 15 महत्त्वपूर्ण व्यापारी संघटना आणि 450 कार्यकर्ते हे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला ऐन लोकसभा निवडणुकीत मोठे खिंडार पडले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केल्याने नाराज झालेल्या देवरा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोबत असलेले 55 वर्षांचे नाते आता संपुष्टात आणले आहे. (Who is Milind Deora who made a mark in politics by becoming the youngest MP?)

हेही वाचा… Congress : भारत जोडो न्याय यात्रेला अपशकून करण्याचा अयशस्वी प्रयत्न, थोरातांची देवरांवर टीका

- Advertisement -

मिलिंद देवरा यांच्या पक्ष सोडण्याने काँग्रेसला याचा खूप मोठा फटका बसला आहे. कारण केंद्रीय मंत्री राहिलेले आणि उच्च शिक्षित काँग्रेसचे नेते म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे पाहिले जायचे. तर 15 व्या लोकसभा निवडणुकीतील मिलिंद देवरा हे सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आले होते. 2004 मध्ये अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रात सुद्धा अनेक महत्त्वाच्या अशा जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. ज्यामुळे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर याचा शिंदेंना मात्र मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे आज राहुल गांधी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरुवात होते आणि त्याच दिवशी देवरांनी बंडाचा झेंडा फडकावल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील मुरली देवरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. ज्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू हे त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच मुरली देवरा यांच्याकडून मिळाले होते. मिलिंद देवरा हे वडिलांप्रमाणेच काँग्रेस पक्षात सक्रिय होते. दक्षिण मुंबईतील व्हीआयपी वर्गासह श्रमिक वर्गाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. ते तरुण, तडफदार आणि धर्मनिरपेक्ष राजकारणी म्हणूनही ओळखले जातात. मिलिंद देवरा उच्चशिक्षित राजकीय नेते असून अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे.

- Advertisement -

मिलिंद देवरा यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जम बसविण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. 2004 मध्ये म्हणजेच वयाच्या 27 व्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवून ते दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. याच लोकसभेतून त्यांचे वडिल मुरली देवरा हे तब्बल 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ज्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्याच हक्काचा मतदारसंघा होता. मुरली देवरा यांनी सलग तीन वेळा (1984 ते 1996) या मतदारसंघातून खासदार पदावर विजय मिळवला होता. त्यानंतर 1996 मध्ये भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांनी देवरा यांचा पराभव करत भाजपाला विजय मिळवून दिला. तर 2004 मध्ये मिलिंद देवरा यांना काँग्रेसने भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांच्याविरोधात उमेदवारी दिली. त्यावेळी मिलिंद देवरा यांनी जयवंतीबेन यांचा 10 हजार 246 मतांनी पराभव केला. त्यानंतर पुन्हा 2009 च्या निवडणुकीत मिलिंद देवरा या पदी खासदार म्हणून निवडून आले.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात तरुण आणि उच्च शिक्षित खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मिलिंद देवरा यांना 5 ऑगस्ट 2004 रोजी त्यांना संरक्षण मंत्रालय समितीचे सदस्य करण्यात आले. 7 ऑगस्ट 2006 रोजी ते केंद्रीय शहर विकास समितीचे सदस्य झाले. 2009 च्या लोकसभेतही पुन्हा खासदार झाल्याने त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली. ते क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिमखान्याचे सदस्य आहेत. नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन झाली. त्यात अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे यांनी त्यांना संयुक्त कोषाध्यक्ष ही जबाबदारी सोपवली होती. पण आता त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -