घरमुंबईसिद्धिविनायक मंदिराच्या कर्मचाऱ्यांना पावला बाप्पा

सिद्धिविनायक मंदिराच्या कर्मचाऱ्यांना पावला बाप्पा

Subscribe

सिद्धीविनायक मंदिराच्या १३३ कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरुपी करून घेण्याचा लाभ मिळणार असल्यानं एक प्रकारे बाप्पाच पावला असं म्हणावं लागेल. आदेश बांदेकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

सिद्धिविनायक मंदिरात काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला आहे. मंदिरात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरुपी करून घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अभिनेता आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष असणाऱ्या आदेश बांदेकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. सिद्धीविनायक मंदिराच्या १३३ कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्यानं एक प्रकारे बाप्पाच पावला असं म्हणावं लागेल.

वर्षभरापासून केला पाठपुरावा

सिद्धिविनायक गणपती मंदिर, प्रभादेवी हा ११ सदस्यांचा ट्रस्ट आहे. घरोघरी ‘होम मिनिस्टर’च्या माध्यमातून पोचलेले ‘भावोजी’ अर्थात आदेश बांदेकर हे २०१७ मध्ये या ट्रस्टचे अध्यक्ष झाले. तेव्हापासूनच कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी रुजू करून घेण्यासाठी आदेश बांदेकर पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून सिद्धिविनायक मंदिर न्यासानं शासनाला पाठवलेला आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. १३३ कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असून सदर संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. काही दिवसापूर्वीच सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून आदेश बांदेकर आता राज्यमंत्री आहेत. याशिवाय शिवसेनेचं सचिवपददेखील त्यांच्याकडे आहे.

- Advertisement -

आदेश बांदेकर राज्यमंत्री

सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा अध्यक्ष असलेला पहिलाचा राज्यमंत्री म्हणून आदेश बांदेकरना हा मान मिळालेला आहे. याअंतर्गत आदेश बांदेकर यांना दरमहा ७५०० मानधन मिळणार असून स्वीय सहायक, शिपाई, मोटार इंधनासाठी वार्षिक ७२ हजार, दूरध्वनीसाठी मासिक ३ हजार, निवासस्थान, बैठक भत्ता इत्यादी १४ सुविधादेखील मिळणार आहेत. मात्र, त्यांना आपल्या गाडीवर राष्ट्रध्वज अथवा लाल दिवा लावता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -