घरमुंबई'सायन फ्लायओव्हर' एप्रिलपासून राहणार बंद

‘सायन फ्लायओव्हर’ एप्रिलपासून राहणार बंद

Subscribe

सायन फ्लायओव्हरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम येत्या २० एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यामुळे या कामासाठी २ महिने सायन फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई पूर्व उपनगरातला वाहतुकीचा कणा असलेला सायन फ्लायओव्हरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम २० एप्रिलपासून सुरू होत आहे. या कामासाठी २ महिने सायन फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सायन फ्लायओव्हरच्या दुरूस्तीच्या कामाअंतर्गत एकूण १७० बेअरींग बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे सायनहून दादरच्या दिशेने जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहणार आहे.

यासाठी करण्यात आली वाहतूक बंद

सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट गेल्या वर्षी आयआयटी मुंबई मार्फत करण्यात आले होते. आयआयटीच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक नियोजनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांबरोबर बैठका पार पडल्या. बेअरिंग बदलण्यात येणार असल्याने तोपर्यंत खबरदारांची उपाययोजना म्हणून उड्डाणपुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविण्यात आले आहे.

- Advertisement -

गुरुवारी रात्री सायन उड्डाणपुलाच्या कठड्याच्या बाहेरील भागातून १० बाय १५ सें.मी. भागातील प्लास्टरचा तुकडा खाली पडला होता. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. मुख्य उड्डाणपुलाच्या कुठलाही भाग खराब झालेला नाही.

दोन महिन्यात १७० बेअरींग बदलणार

उड्डाणपुलाला एकूण १७० बेअरिंग असून दोन महिन्याच्या कालावधीत ते पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. दिनांक २० एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला  सुरुवात होणार आहे. या कालावधीत उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्ण बंद करणे आवश्यक आहे. वाहनचालकांना उड्डाणपुलाखालील रस्ता हा पर्यायी व्यवस्था राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -