घरमुंबईमुंबईच्या झोपडपट्टीतील ड्रग्सचा फैलाव थांबवा; सचिन सावंत यांची मागणी

मुंबईच्या झोपडपट्टीतील ड्रग्सचा फैलाव थांबवा; सचिन सावंत यांची मागणी

Subscribe

ड्रग्सचा फैलाव रोखण्यासाठी पोईसर परिसरात नागरी संस्थांनी राबवलेले सह्यांचे अभियान व जनमानसाचा प्रतिसाद अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्याकडे देण्यात आला. हा प्रकार गंभीर आहे. पोलीस यावर कडक कारवाई करतील आणि मूळापासून ड्रग्सचे रॅकेट खणून काढतील, असे आश्वासन अतिरिक्त पोलिस आयुक्त जैन यांनी दिले.

मुंबईः  मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ड्रग्सचा फैलाव वाढत चालला आहे. युवा पिढी नशेच्या आहारी जात आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील ड्रग्सच्या फैलावाला आळा घालावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी पोलिसांकडे केली आहे.

कांदिवली परिसरातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला सोबत सचिन सावंत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह उत्तर मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांची सोमवारी भेट घेतली. युवा पिढी हे देशाचे भविष्य आहे. ड्रग्सच्या फैलावाने देशाचे भविष्य उद्धवस्त होत तर आहेच पण अनेक कुटुंबाच्या आशा आकांक्षा ही उद्धवस्त होत आहेत. यामागे फार मोठे रॅकेट आहे. आता शाळेतील मुले ही लक्ष्य केली जात आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थामध्येही याचा प्रसार होत आहे. मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील सुरु असलेला हा ड्रग्सचा फैलाव थांबवावा, अशी मागणी सावंत यांनी यावेळी केली.

- Advertisement -

ड्रग्सचा फैलाव रोखण्यासाठी पोईसर परिसरात नागरी संस्थांनी राबवलेले सह्यांचे अभियान व जनमानसाचा प्रतिसाद अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्याकडे देण्यात आला. हा प्रकार गंभीर आहे. पोलीस यावर कडक कारवाई करतील आणि मूळापासून ड्रग्सचे रॅकेट खणून काढतील, असे आश्वासन अतिरिक्त पोलिस आयुक्त जैन यांनी दिले.

यावेळी सचिन सावंत म्हणाले, गुजरातमधील बंदरांमध्ये हजारो किलो ड्रग्स येत आहेत. त्याच्या मूळाशी तपास यंत्रणा पोहोचत नाहीत. या ड्रग्सचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का? याच्या चौकशीची गरज आहे. भाजप या समस्येकडे  केवळ राजकीय दृष्टीकोनातून बघत आहे. नार्कोटीक्स कंट्रोल विभाग ड्रग्स घेणाऱ्यांच्या मागे गेले काही महिने होता. पण ड्रग्स पेडलर पकडले जात नाहीत.

- Advertisement -

प्रत्येक झोपडपट्टीमध्ये नशामुक्ती केंद्र असावे या मागणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे मागणी करु असे सावंत यांनी सांगितले. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक राणा सिंह, मुंबई काँग्रेसचे सचिव आनंद राय, आर. पी. पांडे, रत्नाकर सिंह, सुनिल तिवारी, राकेश झा व काही नागरी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -