घरCORONA UPDATEसोशल डिस्टंसिंग नक्की कुणासाठी? पोलिसांकडून डबलसीट दुचाकीस्वारांवर जबरी कारवाई

सोशल डिस्टंसिंग नक्की कुणासाठी? पोलिसांकडून डबलसीट दुचाकीस्वारांवर जबरी कारवाई

Subscribe

‘साहेब मागे बसलेली माझी पत्नी आहे, आम्ही दुकानात निघालो आहे’ ते आम्हाला काही माहीत नाही. तुम्ही ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळत नाही डबल सीट फिरण्यावर सरकारने मनाई केली आहे, असे सांगून पोलिसांकडून सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली पोलिसाकडून दुचाकीस्वाराकडून दंड वसूल केला जात आहे. पोलिसांसोबत हुज्जत घातल्यास थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी पोलिसांकडून दुचाकीस्वाराला दिली जात असल्याचा प्रकार मुंबई, ठाणे नवी मुंबईत सुरू आहे. पोलिसांच्या या दंडेलशाहीमुळे दुचाकीस्वारामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून अनेक जिल्ह्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. सोशल डिस्टंसिंगसाठी सरकारकडून कडक नियम जारी करण्यात आलेले असून त्यापैकी एक नियम म्हणजे दुचाकीवर डबलसीट असेल तर कारवाई करण्यात यावी. या एका नियमाचे पालन तंतोतंत करताना पोलीस दिसत आहे.
ठाणे पोलिस तर गल्लीबोळात देखील दुचाकीस्वारावर कारवाई करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी गल्लीबोळात लपून सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली डबलसीट असणाऱ्या दुचाकीस्वारांचे ई-चलन फाडत असल्याचा आरोप ठाण्यातील दुचाकीस्वार करीत आहे.

- Advertisement -

दुचाकीवरून पत्नीला घेऊन दवाखान्यात गेलो तरी पोलीस दंड आकारत आहे, त्यांच्याशी हुज्जत घातल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे येथील दुचाकीस्वारांचे म्हणणे आहे. मागे पत्नी बसली आहे, तीला घेऊन कामासाठी निघालो असल्याचे एका पोलिस शिपायाला सांगितले असता तुम्ही सोशल डिस्टंसिंग पाळत नाही म्हणून तुम्हाला दंड भरावा लागणार असल्याचे या पोलीस शिपायाने सांगून ५०० रुपये दंडाचे ई चलन पाठवले, असे एकाने म्हटले आहे. याबाबत काही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता सरकारी नियम असून आम्ही त्याची अंमलबजावणी करीत असल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊनमध्ये लोकांच्या हाताला काम नाही, तर दुसरीकडे सरकारकडून दंडाच्या नावाखाली आर्थिक वसुली सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

सोशल डिस्टंसिंगचे नियम केवळ सर्व सामन्यांना लागू पडतात का, ठाण्यात अनेक हॉटेल मालक पार्सलच्या नावाखाली सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत आहे. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत नाही, असे ठाणे लोकमान्य नगरमध्ये राहणारे निलेश मोरे यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

आम्ही सर्वांनाच दंड आकारत नाही. मात्र विनाकारण दुचाकीवर डबलसीट अथवा मोटारीत चार ते पाचजण एकत्र फिरत असल्यास त्यांच्यावर मात्र आवश्यक कारवाई करतो, असे कळवा वाहतूक विभागाचे अधिकारी महेश पाटील यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -