घरमुंबईमृत्यूनंतरही समाज कार्य; सहा जणांना दिले जीवनदान

मृत्यूनंतरही समाज कार्य; सहा जणांना दिले जीवनदान

Subscribe

वडाळा येथील दिनेश मेहता यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही किमान सहा जणांना जीवदान देत आपले समाज कार्य मृत्यूनंतरही कायम ठेवले. दिनेश यांचे डोळे दोन व्यक्तींना, मूत्रपिंड दोन व्यक्तींना व यकृत एका व्यक्तीला दान करण्यात आले. तसेच त्यांची त्वचाही त्यांनी दान केली.

आयुष्यभर सामाजिक व अध्यात्मिक कार्याला प्राध्यान्य देत लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या करणाऱ्या वडाळा येथील दिनेश मेहता यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही किमान सहा जणांना जीवदान देत आपले समाज कार्य मृत्यूनंतरही कायम ठेवले. वडाळा येथे राहणारे दिनेश मेहता (वय ६४) यांना उच्चं रक्तदाबाचा त्रास होता. २१ जूनला सकाळी ७ वाजता अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने जवळील किकाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानांतर त्यांना २२ जूनला परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले. ग्लोबलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचे तातडीने सीटी स्कॅन व अन्य चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्या केल्यानंतर त्यांचा मेंदूमृत झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दिनेश यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी आजपर्यंत अनेकांना उपचारासाठी, शिक्षणासाठी व आर्थिक मदत केली होती.

सहा व्यक्तींना केले अवयव दान

आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्यात यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांचा मुलगा समीर मेहता याने त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनेश यांचे डोळे दोन व्यक्तींना, मूत्रपिंड दोन व्यक्तींना व यकृत एका व्यक्तीला दान करण्यात आले. तसेच त्यांची त्वचाही त्यांनी दान केली.

- Advertisement -

तरुण पिढीने यातून बोध घ्यावा

व्यक्तीच्या मृत्यूनंतर सर्व संपते असे आपण म्हणतो पण आपला मृत्यूही अनेकांना जीवदान देऊ शकतो असे बाबा आम्हाला सांगायचे. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे अवयव अनेकांच्या कमी आले आहेत. जिवंत असताना बाबा गरजूना उपचारासाठी तसेच शिक्षणासाठी मदत करत असे, तसेच अनेकांना विविध संस्थांमधून मदत उपलब्ध करून देत असे. त्यांच्या मृत्यूनंतरही ते अनेकांच्या मदतीला आले. आजच्या तरुण पिढीने यातून बोध घेऊन अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा असे समीर मेहता यांनी सांगितले.

वडिलांना वाढदिवसाची भेट

२३ जूनला समीरचा वाढदिवस होता. त्यादिवशीच वडिलांचे निधन झाल्याने समीरवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण वडिलांची अवयव दान करण्याची इच्छा पूर्ण करत त्याने आपल्या वडिलांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.

बाबांना त्यांचे सर्व अवयव दान करण्याची इच्छा होती. पण जेवढे अवयव दान करणे शक्य होते. तेवढे आम्ही दान केले. मी व माझ्या बहिणीने बाबांच्या सांगण्यावरून अवयवदानाचा अर्ज भरला आहे. यापूर्वी माझ्या काकांचेही आम्ही अवयवदान केले होते.
– समीर मेहता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -