घरमुंबईअंधेरीतील उर्वरित मोगरा नाल्याचेही काम लवकरच

अंधेरीतील उर्वरित मोगरा नाल्याचेही काम लवकरच

Subscribe

अंधेरी पश्चिम येथील मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम अखेर हाती घेतले जाणार असून लवकरच या नाल्याची खोली वाढवून रुंदीकरण केले जाणार आहे. या रुंदीकरणानंतर नाल्याभोवती संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मोगरा नाल्याच्या भरडावाडी कल्व्हर्ट ते वीरा देसाई रोड कल्व्हर्टपर्यंत आणि नोड १६-सी ते लिंक रोड कल्व्हर्टपर्यंत मोगरा नाल्याची रुंदी अनुक्रमे ६ आणि १० मीटर एवढी आहे. त्यामुळे बर्‍याचदा पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या भागांमध्ये मुसळधार पावसात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या मोगरा नाल्याची रुंदी ब्रिमस्टोवॅड अहवालानुसार १४ ते १५ मीटर एवढी करणे आवश्यक आहे. त्यामुळे मोगरा नाल्याच्या शिल्लक भागाचे वीरा देसाई रोड ते लिंक रोडपर्यंत प्रवाहाच्या खालच्या बाजुने रुंदीकरणासह संरक्षक भिंतीचे आर.सी.सी बांधकाम करण्यात येत आहे.

- Advertisement -

या नाल्याच्या काही भागांचे रुंदीकरण झाल्यानंतर उर्वरीत भागांतील खोली वाढवून रुंदीकरण करत संरक्षक भिंत बांधण्यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये एपीआय सिव्हीलकॉन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने १८ टक्के कमी दराने बोली लावत काम मिळवले आहे. या खोलीकरणासह रुंदीकरण व संरक्षक भिंत उभारण्यासाठी ३०.७० कोटी रुपयांचे कंत्राट या कंपनीला देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -