घरमुंबईसायबर गुन्ह्यांवर प्रतिबंधासाठी नवी मुंबईत अद्ययावत लॅब उभारणार!

सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंधासाठी नवी मुंबईत अद्ययावत लॅब उभारणार!

Subscribe

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अत्याधुनिक लॅब उभारणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली.

महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागच्या पाच वर्षांत राज्यात एकूण १६ हजार ५१२ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी केवळ ४ हजार ५३० गुन्हे उघड झाले आहेत. पुढील काळात सायबर गुन्ह्यांची उकल अधिक जलद आणि अचूक पद्धतीने होण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे अद्ययावत लॅब उभारण्यात येणार असून त्यासाठी ९१५ कोटींची तरतदू केली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. विधानपरिषद सभागृहात काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुख यांनी ही घोषणा केली.

नियंत्रणासाठी मनुष्यबळ अपुरं…

राज्यात मागच्या दोन वर्षांत किती सायबर गुन्हे घडले आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ अपुरे असल्याचा प्रश्न अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, २०१८ साली ३५११, २०१९ साली ४८२२ आणि मागच्या पाच वर्षात एकूण १६ हजार ५१२ गुन्ह्यांची नोंद झाली असून ४५३० गुन्हे उघडकीस आले. तर सोशल मीडिया आणि ईमेलद्वारे महिला आणि अल्पवयीन तरुणींना मेसेज पाठवल्याबाबत २०१८ साली ८६७ आणि २०१९ साली ७९९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राचा सायबर सेल हा देशात प्रथम क्रमांकाचा सेल आहे, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले. राज्यात एकूण ४३ सायबर लॅब्सना पोलीस ठाणे म्हणून घोषित करण्यात आले आहे. या लॅब्समध्ये ५५० पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईत बीकेसी येथे स्वंतत्र सायबर पोलीस ठाणे अस्तित्वात आहे. तसेच मुंबईत ९१ पोलीस ठाण्यात सायबर कक्ष अस्तित्वात आहे, अशीही माहिती देशमुख यांनी दिली.

विधानपरिषदेत आला ‘जमतारा’चा उल्लेख

या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान सदस्य सदाभाऊ खोत, सुरेश धस, रणजीत पाटील, हेमंत टकले यांनी उपप्रश्न विचारले. राज्यातील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रशिक्षण द्यावे, अशीही मागणी यावेळी काही सदस्यांनी लावून धरली. तसेच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सायबर गुन्ह्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर पोलिसांना बढती देण्यात यावी, असे सांगितले. यावर उत्तर देताना देशमुख म्हणाले की, ‘सायबर गुन्ह्यांवर आधारीत जामतारा नावाची नेटफ्लिक्सवर एक सिरीज आलेली आहे. पुण्यात मागच्यावर्षी इतर गुन्ह्यांसोबत साडे सात हजार सायबर गुन्हे घडले आहेत. सायबर गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता प्रशिक्षित अधिकारी निर्माण करुन सायबर विभाग अद्ययावत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत’.


हेही वाचा – Corona Virus Update : अधिवेशन शनिवारपर्यंत गुंडाळणार, विधानसभेत ठराव मंजूर!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -