घरमुंबईस्मार्ट कार्डमुळे एसटीच्या सवलत धारकांना लागणार कात्री

स्मार्ट कार्डमुळे एसटीच्या सवलत धारकांना लागणार कात्री

Subscribe

एसटीच्या लाभार्थी कमी मात्र अनुदान २७९ कोटीची वाढ

राज्य सरकारला वर्षाला एसटीतील सवलतधारकाच्या अनूदानरूपी एसटी महामंडळाला कोटयावधी रूपये द्यावे लागत होते. मात्र गेल्या पाच वर्षात ३ कोटी ४३ लाख इतके एसटीतील प्रवासात सवलतधारक लाभार्थ्यांची संख्या किमी झाली. मात्र सवलतधारकाच्या अनूदान २७९ कोटी इतकी वाढ झाली आहे. हा आर्थिक बोज कमी करण्यासाठी व बोगस लाभार्थीना आळा घाल्याण्यासाठी एसटीने स्मार्ट कॉड योजना आनली आहेत. याची सुरुवात सुध्दा झाली असून जवळ यावर्षी एसटीचे बोगस लाभार्थी कमी होणार आहे. त्यामुळे राज्य परिवहण महामंडळाच्या सवलत धारकाना लवकरच कात्री लागणार आहेत.

एसटी महामंडळाकडून २९ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडयात सवलती देण्यात येत आहेत. रा.प. बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येते.ज्यामध्ये विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक ,स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, पत्रकार, राज्य शासनाचे पुरस्कार विजेते, दुर्धर आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळामार्फत सवलत देण्यात येते.यामध्ये सर्वाधिक लाभार्थी ज्येष्ट नागरीक आणि विद्यार्थी आहेत.मात्र गेल्याकाही वर्षापासून यासवलती धारकामध्ये बोगस सवलती धारकाची संख्या आढळून आल्याने, एसटी महामंडाने यावर आळा घालन्यासाठी स्मार्ट कार्ड योजना आनली आहेत. प्रवासी भाडयात सवलती घेणार्यांना आता आता स्मार्ट कार्ड घेण्यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सध्या ज्यांच्याकडे स्मार्टकार्ड आहेत त्यांना स्मार्ट कार्डच्या आधारे प्रवास सवलत देणे सुरू केले आहेत. पुर्वी एसटी बसने प्रवास करताना जेष्ठ मंडळींना मतदान कार्ड, आधारकार्ड सोबत बाळगावे लागत होते,त्यामध्ये अनेक जेष्ट नागरी सागून प्रवास सवलती लाभ घेत होते. मात्र यामध्ये बनावट कागदपत्रे दाखवून ६० वयवर्ष पुर्ण झाले असे सांगणारे बसप्रवास करणारे अनेक प्रवासी असतात. अनेकांवर यापूर्वी कारवाई देखील झाली होती. मात्र आता या स्मार्ट कार्ड योजना लागू केल्याने बस प्रवासादरम्यान होणारी फसवेगिरी आणि त्यामुळे होणार्या महामंडळाचे आर्थिक नुकसानाला आळा घालता येणे शक्य होणार आहेत.

सोबतच स्मार्ट कार्डमुळे एसटीच्या सवलत धारकांना लागणार कात्री सुद्धा लागणार आहेत. यापुर्वी राज्य सरकारला वर्षाला एसटी कोटयावधी रूपये सवलतधारकाच्या अनूदान रूपी द्यावे लागत होते. मात्र आता नव्या वर्षापासून याअनूदान मोठया प्रमाणात घट होणार आहे. नुकतेच राज्य सरकाराकडून मागच्या वर्षीचे सवलत धारकाचे १६२० कोटीचे अनूदान एसटी महामंडळाला दिले आहे.

- Advertisement -

लाभार्थीची संख्या कमी, मात्र अनुदान वाढले
२०१४ – १५ मध्ये एसटी प्रवासात सवलतधारक लाभार्थ्यांची संख्या ४२ कोटी ४३ लाख इतके होती. मात्र २०१८- १९ मध्ये या लाभार्थ्यांची संख्या ३९ कोटीच्या घरात पोहचली आहेत. जवळ जवळ गेल्या पाच वर्षात ३ कोटी ४३ लाख इतके सवलतधारक लाभार्थ्यांची संख्या किमी झाली आहे. मात्र अनुदान भरमसाठ वाढ झाल्याचं दिसून येत आहेत. २०१४- १५ मध्ये ४२ कोटी ४३ लाख सवलतधारक लाभार्थ्यांसाठी १३४१ कोटी रुपये राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला मिळाले होते. तर २०१८- १९ मध्ये लाभार्थ्यांची संख्या ३९ कोटी असताना,सवलतीची रक्कम १६२० कोटीवर जाऊन पोहचली आहे. म्हणजे गेल्या पांच वर्षात २७९ कोटी रुपयाची वाढ झाली आहेत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -