घरमुंबईएसटीच्या पहिल्या इलेक्ट्रिकल बसचे लोकार्पण

एसटीच्या पहिल्या इलेक्ट्रिकल बसचे लोकार्पण

Subscribe

एसटीच्या पहिल्या इलेक्ट्रिकल बसचे लोकार्पण झाले असून या बसचे नामकरण शिवाई असे करण्यात आले आहे.

एसटीच्या पहिल्या इलेक्ट्रिकल बसचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. या बसचे नामकरण शिवाई असे करण्यात आले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाईचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते देखील उपस्थित होते. शिवाई बस दादर ते पुणे दरम्यान धावणार आहे. याशिवाय विजेवर चालणाऱ्या या बसमुळे एसटीचा बराच खर्च वाचणार आहे. याशिवाय पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून विजेवर चालणारी बस येणार अशी चर्चा होती. अखेर एसटीच्या पहिल्या इलेक्ट्रिकल बसचे लोकार्पण झाले.

- Advertisement -

‘हे’ आहेत शिवाईचे वैशिष्ट्ये

शिवाई बसची आसन क्षमता ४४ इतकी असणार आहे. ही बस वातानुकुलित असणार आहे. या बसला चार्ज होण्यासाठी १ ते ५ तास लागणार आहेत. एकदा बसला चार्ज केले तर ३०० किमीपर्यंतचा पल्ला गाठता येणार आहे. या बसचा खर्च शिवनेरी बसपेक्षा कमी होणार आहे. शिवाई बसमध्ये सीसीटीव्ही, व्हिटीएस या सारख्या देखील सुविधा असणार आहेत. सुरुवातीला या शिवाईचे १५० बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. या बसेसच्या पार्किंगसाठी देखील सुविधा करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरे यांच्यानंतर आता नितीन सरदेसाईंची ईडी चौकशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -