घरताज्या घडामोडीSchool Reopen In Mumbai: बुधवारपासून मुंबईत पहिली ते सातवीचे वर्ग होणार सुरू

School Reopen In Mumbai: बुधवारपासून मुंबईत पहिली ते सातवीचे वर्ग होणार सुरू

Subscribe

मुंबईतील उद्या, बुधवारपासून शाळा सुरू होणार आहे (School Reopen In Mumbai). मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार, उद्यापासून मुंबईतील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करणार आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी त्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. दरम्यान ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळा सुरु करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला होता.

- Advertisement -

कोरोनामुळे तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या मुंबईच्या शाळा आता उद्यापासून सुरू होत आहेत. मागच्या महिन्यात कोरोना नियंत्रण आटोक्यात आल्यामुळे राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आला होता. परंतु ओमिक्रॉनच्या भितीमुळे मुंबई महापालिकेकडून शाळा सुरू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे आता उद्यापासून मुंबईतील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार आहेत. म्हणून शिक्षण विभागाकडून जोरदार तयार करण्यात आली आहे.

दरम्यान आता मुंबईतील शाळा कोणत्याही परिस्थितीत सुरू केल्या जाणार असून या निर्णयात कोणताहा बदल होणार नसल्याचे बीएमसीच्या शिक्षण विभागाकडून स्पष्ट रण्यात आले आहे. तसेच ज्या शाळांना याबाबत महिती मिळाली नाही, त्या शाळांना पुन्हा सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. माहितीनुसार आज, मंगळवारी सकाळी शाळा सुरू करण्याबाबत एक आढावा बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये काही राहिलेल्या त्रुटींसंदर्भात तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Corona vaccination : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत रात्रीच्या वेळी लसीकरणावर भर, मुंबई महापालिकेकडून विशेष प्रयत्न


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -