घरमुंबईतनुश्रीच्या प्रकरणी महिला आयोगाने 'यांना' पाठवली नोटीस

तनुश्रीच्या प्रकरणी महिला आयोगाने ‘यांना’ पाठवली नोटीस

Subscribe

तनुश्री दत्ता यांच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली आहे. नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी, राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे ८ ऑक्टोबरला दाखल केलेल्या तक्रारीची आयोगाने दखल घेतली आहे. नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी, राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावली आहे. तनुश्री दत्ताने आपली लेखी तक्रार वकिलामार्फत आयोगाकडे सादर करण्यात आली होती. या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी तनुश्री दत्ताने स्वत: उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत.

हे वाचा – तनुश्रीचे नाना नारे!

आयोगाने तक्राराची घेतली दखल

तनुश्री दत्ताच्या तक्रारीत उल्लेख असलेले अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावत १० दिवसात आपले म्हणणे आयोगाकडे प्रत्यक्षपणे मांडावे, असे निर्देश दिले आहेत. तनुश्री दत्ता यांनी आयोगाकडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत मुंबई पोलिसांकडे सदर प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांकडून याबाबत आतापर्यंत काय कार्यवाही करण्यात आली? याचा अहवाल आयोगाने मागविला आहे.

- Advertisement -

हे वाचा – तनुश्रीचे तेव्हा पीरियड्स सुरू असतील – सामी सिद्दीकी

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले निर्देश

सिनेसृष्टीतील अशा घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसेच संबंधित संघटनांची देखील आहे. महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यास तसेच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. यादृष्टीनेच लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, २०१३ या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ तक्रार निवारण समिती (आयसीसी कमिटी) स्थापन करावी, असे निर्देश आयोगाने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -