घरमुंबईनायर हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ अखेर सापडले

नायर हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ अखेर सापडले

Subscribe

व्ही.एन. देसाई हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी बाळ चोरणाऱ्या महिलेचा खोटेपण उघडा पाडला आणि नायरमधील मातेला तिचे बाळ मिळाले.

नायर हॉस्पिटलमधून गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आलं आहे. अगदी १० तासांमध्ये हे बाळ मातेच्या कुशीत परतलं. आग्रीपाडा पोलिसांनी नायर हॉस्पिटलमधून बाळ चोरणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

बाळ चोरीला गेल्याच्या घटनेनंतर आग्रीपाडा पोलीस सीसीटिव्हीच्या आधारे तिचा तपास करत होते. पण, अखेर आग्रीपाडा पोलिसांना या महिलेला शोधून ताब्यात घेतलं आहे. व्ही.एन.देसाई या हॉस्पिटलमध्ये ही महिला ते आपलं बाळ असून तपासणीसाठी घेऊन आल्याचं सांगत होती. पण, उपस्थित पोलीस आणि सुरक्षारक्षकांना तिच्या बोलण्यात खोटेपणा वाटला म्हणून त्यांनी या महिलेची माहिती तिथल्या डॉक्टरांना दिली. शिवाय, चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे ही महिला कशी दिसते याचा पोलिसांना अंदाज होता. तात्काळ ही महिला व्ही.एन.देसाई हॉस्पिटलमध्ये आल्याचं आग्रीपाडा पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -
v n desai security staff
व्ही.एन. देसाई हॉस्पिटलच्या याच सुरक्षा रक्षकांनी बाळ चोरणाऱ्या महिलेचा खोटेपण उघडा पाडला.

ही महिला गुरुवारी संध्याकाळी बाळाला घेऊन सांताक्रूझमधील व्ही.एन.देसाई या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. त्यानुसार, वाकोला परिसरातून पोलिसांनी बाळ आणि महिलेला ताब्यात घेतलं. हेजल कारिया (३७) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने नायरमधून गुरुवारी पाच दिवसांच्या बाळाची चोर केली होती. ही आरोपी महिला  नालासोपारा परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. मात्र, बाळ चोरी करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

infant baby thief and baby's family
डाव्या बाजूला बाळ आणि बाळाचे परिवार, उजव्या बाजूला आरोपी हेजल कोरिया

 

- Advertisement -

हे वाचा – CCTV – धक्कादायक! नायर रुग्णालयात महिलेने पळवलं बाळ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -