घरमुंबईइराकमधील लहानग्यावर नवी मुंबईत शस्त्रक्रिया

इराकमधील लहानग्यावर नवी मुंबईत शस्त्रक्रिया

Subscribe

२ वर्षीय मुलाच्या लहान आतड्यातील ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडावी यासाठी त्याच्या कुटुंबियांनी इराकहून थेट नवी मुंबई गाठली.

नवी मुंबईतील तेरणा हॉस्पीटलमध्ये इराकमधील २ वर्षीय मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे तेरणा हॉस्पीटलमधील डॉक्टर्सच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. गेल्या दोन महिन्यापासून मोहम्मद असिफ हा पोटदुखीने त्रस्त होता. पोटदुखीचा त्रास वाढल्यानंतर पालकांनी त्याला इराकमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

वैद्यकीय तपासणीत त्याच्या लहान आतड्याच्या बाजूला एक ट्युमर असल्याचं निदान झालं. हा ट्युमर काढण्यासाठी स्थानिक डॉक्टरांनी पोटाची शल्य चिकित्सा करण्याचा सल्ला दिला. पण, ही शल्यचिकित्सा पोट उघडून करावी लागणार असंही डॉक्टर्सने यावेळी सांगितलं. मात्र या शल्यचिकित्सेमध्ये जोखीम होती.

- Advertisement -

शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे इराकच्या डॉक्टर्सचे म्हणणे

त्यामुळे त्याच्या वडिलांनी भारतात राहणाऱ्या नातेवाईकांच्या मदतीने नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमधील लॅप्रोस्कोपीक शल्यचिकित्सक डॉ. नितीन तवटे यांनी रूग्णाचे सर्व रिपोर्ट्स पाहिले. यावेळी पोट न उघडता लॅप्रोस्कोपीक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचे सुचवण्यात आले. मोहम्मदच्या लहान आतड्याच्या बाजूला रक्तवाहिन्यांमध्ये ५ सेंटीमीटरचा एक ट्युमर होता. हा ट्युमर रक्तवाहिन्याच्या कोशात असल्यामुळे तो काढण्याची शस्त्रक्रिया कठीण होती. हा ट्युमर काढत असताना कदाचित त्याच्या लहान आतड्याला इजा होईल किंवा ते निकामी होईल, असं इराकमधील डॉक्टरांनी सांगितलं होतं.

हेही वाचा – नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला मध्यवर्ती मार्डचा विरोध

अनुवांशिक कारणाने ट्युमर होऊ शकतो

पण, आम्ही केलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या छोट्या आतड्याला कोणतीही दुखापत झाली नाही. मोहम्मदच्या पोटावर फक्त ५ मिलीमीटरचा छेद देऊन हा ट्युमर सिंड एन्डोबॅगमध्ये विघटित करून काढण्यात आला, असं लॅप्रोस्कोपीक शल्यचिकित्सक डॉ. नितीन तवटे यांनी सांगितलं. लहान मुलांमध्ये पोटातील लहान आतड्याला असलेला हा ट्युमर फारच दुर्मिळ प्रमाणात आढळतो. हा ट्युमर कदाचित अनुवांशिक कारणाने होऊ शकतो, असंही डॉ. तवटे यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -