घरमहाराष्ट्रनाशिकदेशभरात प्रत्येक बूथवर भाजपाचा झेंडा हाती घेणारा कार्यकर्ता हवा: व्ही सतीश

देशभरात प्रत्येक बूथवर भाजपाचा झेंडा हाती घेणारा कार्यकर्ता हवा: व्ही सतीश

Subscribe

नाशकात शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक संपन्न.

देशभरात 14 लाख बूथ असून तेथे भाजपाचा झेंडा हाती घेणारा कार्यकर्ता हवा. त्यासाठी प्रचंड मेहेनत, कठोर परिश्रम घेऊन लोकांशी संपर्क वाढवावा लागेल. सर्व समाजाला एकत्र बांधून ठेवण्यास पक्ष यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल आणि त्यामुळेच शक्तीकेंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी ती चोखपणे पार पाडावी, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही.सतीश यांनी केले.

भारतीय जनता पार्टीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक हॉटेल रॉयल हेरिटेज येथे पार पडली त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना व्ही. सतीश बोलत होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशाला खंबीर नेतृत्व दिले. सर्जिकल स्ट्राईकच्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत कुणी करीत नाहीत.त्यांच्या पारदर्शी कारभरामुळेच लोकांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमताने पुन्हा निवडून दिले याची आठवण करून देत व्ही.सतीश यांनी शक्तिकेंद्र प्रमुख, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याशी मनमोकळा संवाद साधत त्यांची मते आणि भावना जाणून घेतल्या. प्रत्येक निवडणुका या वेगळ्या असतात. महाराष्ट्रात होवू घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी सर्वानी कंबर कसावी, असे आवाहनही व्ही. सतीश यांनी यावेळी केले.

- Advertisement -

नाशिक महानगरात सदस्य आणि मतदार नोंदणी मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप 31 ऑगस्टला नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने होणार असून नाशिकला मिळालेला हा एकप्रकारे बहुमानच आहे. पंतप्रधानांची सभा मोठ्याप्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास महानगर अध्यक्ष आ.बाळासाहेब यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.

व्यासपीठावर विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, चिटणीस लक्ष्मण सावजी, महानगर अध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, प्रदीप पेशकार आदी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -