घरमुंबईशिक्षणमंत्र्यांवर कारवाई करा

शिक्षणमंत्र्यांवर कारवाई करा

Subscribe

सिनेट सदस्यांची राज्यपालांकडे मागणी

अमरावती येथे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका विद्यार्थ्याला अपमानास्पद वागणूक देत बेताल वक्तव्य केले होते. तावडेंच्या वक्तव्याविरोधात युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अथवा त्यांनी नागरिकांची माफी मागावी यासाठी थेट राज्यपालांकडेच तक्रार केली.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला शालेय शिक्षणमंत्री तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, ते गैरहजर राहिल्याने युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच तावडे यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, प्रविण पाटकर, शशिकांत झोरे, सुप्रिया करंडे, मिलिंद साटम, शितल शेठ-देवरूखकर, निखिल जाधव, वैभव थोरात व धजराज कोहचाडे उपस्थित होते.

- Advertisement -

भारतीय राज्य घटनेने सर्वांना प्रश्न विचारण्याचा व मत मांडण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला ते पत्रकारितेचे विद्यार्थी होते. त्याचे भान शिक्षणमंत्र्यांना राहिले नाही. त्यावर त्यांनी तोंडसूख घेतले. त्यानंतर प्रश्न विचारणार्‍या विद्यार्थ्याला अटक करायला लावून तावडे यांनी आपल्या हुकूमशाहीचे दर्शन दिले. त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यावर आपण कुलपती म्हणून विद्यार्थी वर्गाची माफी मागावी, अशी विनंती युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी राज्यपालांना केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -