घरमुंबईशहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु

शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु

Subscribe

छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील हिमालय पूल दुघर्टनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले. शहर भागातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करणार्‍या डि.डि. देसाईज असोसिएटेड कंपनीला काळ्या यादीत टाकून कंपनीच्या संचालकांना तुरुंगात डाबल्यानंतर या भागातील पुलांचे फेर स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी नवीन कंपनीचा शोध सुरु झाला आहे. यासाठी स्ट्रक्चरल ऑडीट करणार्‍या कंपन्यांकडून स्वारस्य अर्ज मागवण्यात आले असल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

हिमालय पुलाच्या दुघर्टनेनंतर या पुलासह शहर भागातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करणार्‍या डि.डि. देसाईज असोसिएटेड कंपनीला जबाबदार ठरवून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिलेले असून दुघर्टनेप्रकरणी कंपनीचे संचालक निरज देसाई यांना अटक करण्यात आले. दुघर्टनेनंतर आयुक्तांनी पूर्व व पश्चिम उपनगरांतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करणार्‍या कंपन्यांना आदेश देवून फेर स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु शहर भागातील कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याने यासाठी नवीन कंपनीची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

शहर भागातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी कंपन्यांकडून स्वारस्य अर्ज मागवण्यात आले असून यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे पुल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र कंपनीची निवड करून त्यांच्यामार्फत फेर स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांचा सभात्याग
शहर भागातील १६ पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला होता. परंतु हा प्रस्ताव मागे घेतला जाईल, असे बोलले जात असतानाच समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्ताव राखून ठेवला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. काळ्या यादीतील सल्लागाराने सुचवल्याप्रमाणे या प्रस्तावात कामांचा समावेश होता. त्यामुळे यावर चर्चा व्हायला हवी अशी विरोधक मागणी करत होते. परंतु प्रस्ताव राखून ठेवल्यानंतरही चौकीदार म्हणवणारे भाजपचे सदस्य मूग गिळून गप्प राहिले. त्यामुळे याचा निषेध म्हणून विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सेना-भाजप विरोधात घोषणा देत सभात्याग केला.

- Advertisement -

डि.डि. देसाईज असोसिएटेड कंपनीने केलेल्या पुलांचे ऑडीट
एकूण पुलांची संख्या : ८५
सुस्थितीतील पुलांची संख्या: १७
किरकोळ स्वरुपाच्या पुलांची संख्या: ४३
मोठ्या स्वरुपाच्या पुलांची संख्या: १९
पाडण्यात येणार्‍या पुलांची संख्या: ०३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -