घरमुंबईखासगी शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांची निवड मुलाखतीच्या आधारे

खासगी शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांची निवड मुलाखतीच्या आधारे

Subscribe

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र असलेल्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिक्षणसेवकांची भरती करण्यासाठी शिक्षण विभागाने टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. टीईटीमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवाराची निवड करण्यासाठी खासगी शैक्षणिक संस्थांना एक सूट दिली आहे. त्यानुसार अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीतील (टीईटी) उच्चतम गुण प्राप्त करणार्‍या उमेदवारांपैकीच शिक्षक सेवकांची अंतिम निवड या संस्थांना करावी लागणार असल्याने खासगी संस्थांकडून होणारा भरतीचा बाजारही रोखण्यात आला आहे.

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच शासकीय अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी. यासह उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी यादृष्टीने टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. खासगी संस्थांमधील शिक्षकांची पदे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. या शाळांमधील शिक्षक निवड पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. यानुसार टीईटी परीक्षेत उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीमार्फत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

टीईटी परीक्षा शिक्षण विभाग घेईल. या परीक्षेतील उच्चतम गुण प्राप्त विद्यार्थ्यांची निवडसुची संबंधित खासगी शैक्षणिक संस्थेच्या लॉगिंगवर शिक्षण संचालक उपलब्ध करून देणार आहेत. संबंधित संस्था मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या निवडसुचीतील उमेदवारांची मुलाखत घेऊन व त्यांची अध्यापन कौशल्य तपासून त्याआधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराची निवड करेल. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असणार आहेत. मुलाखतीनंतर संस्था उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करेल, तसेच मुलाखतीला उपस्थित राहिलेल्या उमेदवारालाही त्यांचा निकाल कळवणार आहेत. गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवाराची नियुक्ती संस्था सात दिवसात करणार आहे. निवड झालेला उमेदवार सात दिवसात हजर न राहिल्यास पुढील उमेदवाराची नियुक्ती करण्याचा अधिकार संस्थेला देण्यात आला आहे.

शिक्षणसेवक भरती सुधारित कार्यपध्दती अशी असणार
1. सरल प्रणाली अंतर्गत नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची संचमान्यता करण्यात येईल.
२. संचमान्यतेपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार.
३. विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदु नामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील पवित्र या संगणकीय प्रणालीमध्ये भरून त्यानुसार पदभरती जाहिरात संदर्भातील परवानगी संदर्भीय सक्षम प्राधिकार्‍याकडून घ्यावी लागेल.
४. खासगी व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शिक्षण नियुक्तीचे अधिकार हे संस्थाचालकांना देण्यात आले आहेत, अभियोग्यता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या मेरीटनुसार विद्यार्थ्यांची नावे ही संस्थेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध होतील व त्या विद्यार्थ्यांची 30 गुणांची मुलाखत घेऊन उच्च गुण प्राप्त विद्यार्थ्यांची निवड ही संस्थेला करता येणार आहे.
3. अभियोग्यता चाचणीचे आयोजन हे वर्षातून दोनदा न करता आवश्यकतेप्रमाणे करण्यात येणार आहे.
4. प्राधान्यक्रम भरताना त्यांची मर्यादा घालण्यात आलेली नाही, विषय व प्रवर्ग यानुसार विचार करून उमेदवार प्राधान्यक्रम देऊ शकतील, उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम देता येईल.
5. अभियोग्यता चाचणीमधील गुण वाढीसाठी उमेदवाराला 5 संधी असतील, निवड झालेल्या उमेदवाराचे त्या तारखेपर्यंतचे गुण बाद ठरविण्यात येतील, प्राप्त गुणांचा उपयोग एकापेक्षा अधिक वेळा करता येणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -