ठाकरे सरकारनं संजय पांडेना मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट दिलेल– फडणवीसांचा गौप्यस्फोट

मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट तत्कालिन पोलीस आयुक्त संजय पांडेना देण्यात आलं होतं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

devendra fadanvis attack mumbai bmc thackeray govt on roads and water

मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट तत्कालिन पोलीस आयुक्त संजय पांडेना देण्यात आलं होतं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद केल्याची खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहीनीने आयोजित केलेल्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी मविआ, उद्धव ठाकरे यांच्याशी असलेली मैत्री यावर मनमोकळा संवाद साधला. तसेच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या बिनसलेल्या मैत्रीवरही भाष्य केले. पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केले. त्यांनी माझा एक फोनही उचलला नाही. त्यांनी सौजन्य म्हणूनही माझ्याशी बोलणं योग्य समजल नसल्याचे सांगत उद्धव यांनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केल्याची खंत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र मी कधीही राजकीय वैर मनात ठेवत नाही असेही यावेळी फडणवीस यांनी म्हटले.

त्याचबरोबर मविआच्या अडीच वर्षांच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीही प्रयत्न झाले. त्यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आल्याचा गौप्यस्फोटही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.