घरमुंबईThackeray memorial: बाळासाहेब हे तर महाराष्ट्राचे नेते, विरोधी पक्षामुळे कार्यक्रमाची उंची वाढली...

Thackeray memorial: बाळासाहेब हे तर महाराष्ट्राचे नेते, विरोधी पक्षामुळे कार्यक्रमाची उंची वाढली असती – दरेकर

Subscribe

बाळासाहेबांनी पहिले आमंत्रण फडणवीसांना दिले असते - राणे

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला इतरांना महत्त्व द्यावे असे वाटत नाही त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना कार्यक्रमास बोलावले नसेल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे घरातील व्यक्ती होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकासाठी परवानग्या घेतल्या होत्या स्मारक व्हावे यासाठी फडणवीसांनी अनेक प्रयत्न केलेत त्यामुळे त्यांना स्मारकाच्या भूमिपूजनासाठी बोलावले पाहिजे होते विरोधीपक्षनेत्यांना निमंत्रित केले असते तर कार्यक्रमाची उंची वाढली असती. असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, शिवसेनेला इतरांना महत्त्व द्यावे असे वाटत नसेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना सर्व पक्षीय नेत्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला होता. हे बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम आहे. ही वास्तु चिरंतर टीकणारी त्यामुळे अशावेळी बोलावले असते तर त्या कार्यक्रमाची उंची निश्चित राहिली असती कारण बाळासाहेब हे सर्वांचे आवडते होते. परंतु राजकारण एवढे टोकाला पोहचले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीव्यतिरिक्त कोणालाही बोलाविले नसावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे घरातील व्यक्ती होते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी या स्मारकासाठी सतत पुढाकार घेतला, सरकारी परवानग्या घेतल्या होत्या त्यांचे मोठे योगदान होते तर त्यांना निमंत्रित करायला हवे होते असे विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांनी पहिले आमंत्रण फडणवीसांना दिले असते – राणे

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर पहिले आमंत्रण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिले असते. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत! असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाला का बोलावले नाही असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आज बुधवार ३१ मार्चला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. राज्यात सध्याच्या कोरोना प्रतिबंधक नियमावलीमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा भूमिपूजन सोहळा ३१ मार्च सायंकाळी ५.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. सध्या राज्यात कोरोना संसर्ग वाढलेला असल्यामुळे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा करण्यात येणार आहे.


हेही वाचा: बाळासाहेब ठाकरे स्मारक भुमिपूजन सोहळा: फडणवीस, राज यांना निमंत्रण नाही


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -