घरमुंबई'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर ठाकरेंची शाबासकीची थाप, म्हणाले शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र

‘त्या’ शिवसैनिकांच्या पाठीवर ठाकरेंची शाबासकीची थाप, म्हणाले शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र

Subscribe

मुंबई – मुंबईतल्या राडा प्रकरणातील शिवसैनिकांचे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कौतुक केले. महेश सावंत आणि इतर 5 शिवसैनिकांचे कौतुक करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युावसेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

त्यामुळे आम्हाला आमची ताकद दाखवावी लागली –

- Advertisement -

कोणी अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर महेश सावंत यांनी दिली. 2 महिन्यांपासून आम्ही पोलिसांना सांगत होतो त्यांना आवरा. त्यांनी आमच्यावर फायरिंग केली. या फायरिंगमध्ये पोलीस जखमी झाला असता. त्यामुळे आम्हाला आमची ताकद दाखवावी लागली. यावेळी आम्ही शिवसेनेशी निष्ठावंत असल्याचे महेश सावंत यांनी सांगीतले.

असा झाला वाद  –

- Advertisement -

प्रभादेवीत परिसरात शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील वाद पुन्हा पेटला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीतील वादाचे हाणामारीत रुपांतर झाले होते. त्यानंतर आज सकाळपासून दोन्ही गट दादर पोलीस स्टेशन परिसरातही आमनेसामने आले. या राड्याप्रकरणी शिवसेनेच्या महेश सावंत यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली होती. या राड्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला असा आरोप आमदार सुनील शिंदेंनी केला होता.

कोण आहेत महेश सावंत – 

महेश सावंत आमदार सदा सरवणकर  यांचे कट्टर समर्थक होते. मात्र, 2017 मध्ये सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात बिनसले. 2017 महापालिका निवडणुकीत सदा सरवणकरांनी मुलगा समाधान सरवणकर याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांमुळे नाराज महेश सावंत यांनी बंड पुकारात अपक्ष निवडणूक लढवली. मुंबई मनपा निवडणुकीत  समाधान सरवणकर विजयी झाले पण दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार महेश सावंत होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -