घरCORONA UPDATEठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली

Subscribe

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली करण्यात आली आहे. त्या पदावर डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या ३ महिन्यात सिंघल यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या संदर्भातले पत्र पाठवले आहे. डॉ. विपीन शर्मा हे विदेशी प्रशिक्षणासाठी गेले आहेत. तिथून आल्यानंतर त्यांनी तातडीने ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे कुंटे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

ठाण्यात संजीव जयस्वाल यांनी तब्बल ५ वर्षे २ महिने असा विक्रमी कालावधी पूर्ण केला. मात्र त्यांचा संपूर्ण कार्यकाळ बेधडक आणि वादग्रस्त ठरला. पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांवरील व्हॉट्सअपवरील वाद चांगलाच गाजल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तत्कालीन महापौर मिनाक्षी शिंदे यांच्याशी झालेला वाद सोडवण्यासाठी थेट मातोश्रीला मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बदलीच्या निर्णयावरून वादंग झाल्यानंतर ते दीर्घ काळ सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी कार्यभार सोडला होता.

एकीकडे करोनाचे संकट उभे ठाकले असतानाच मार्च महिन्यात जयस्वाल यांच्या जागी विजय सिंघल यांच्याकडे आयुक्तपद देण्यात आले होते. पाच वर्षांनी ठाणे महापालिकेला नवे आयुक्त मिळाले होते. मात्र तीन महिन्यात त्यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

२४ तासांत मुंबईत ८४६ कोरोनाचे नवे रुग्ण, ४२ जणांचा मृत्यू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -