घरमुंबईठाणेकरांसाठी ‘आपला दवाखाना’; ठामपा उभारणार 50 आरोग्य केंद्र

ठाणेकरांसाठी ‘आपला दवाखाना’; ठामपा उभारणार 50 आरोग्य केंद्र

Subscribe

ठाणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज ‘आपला दवाखाना’ योजनेला प्रचंड गदारोळात मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाने आपला दवाखाना योजना विरोधी पक्षाला न जुमानता मंजुर करून घेतली. यामुळे विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील भाजपचे नेतेही आक्रमक झाले होते. मात्र सुमारे वर्षाला सुमारे 28 कोटीचा मलिदा देणारा हा प्रकल्प प्रशासनाच्या सहकार्याने सत्ताधारी पक्षाने मंजुर करून घेतला.

महासभेकडून मंजूरी मिळण्याआधीच या प्रकल्पाची टेंडर काढण्यात आल्याने विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी हरकत नोंदवली. मात्र त्यांच्या हरकतीला कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यास सत्ताधाऱयांसह प्रशासनानेही टाळले. लोकसंख्येच्या मानाने केवळ 40 आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. त्यातील 27 आरोग्य केंद्र उपलब्ध आहेत. तेव्हा आता फक्त 13 केंद्रांची आवश्यकता आहे. या आरोग्य केंद्राची पुढील काळाकरिता नियोजन आणि पालिकेचे धोरण काय असेल याबाबतही ठाणे महापालिकेने खुलासा करावा असे संदिप लेले आणि मिलिंद पाटणकर यांनी विचारले मात्र त्यांच्याही प्रश्नांना सत्ताधाऱयांनी बगल दिली.

- Advertisement -

या योजनेअंतर्गत ठाणे शहरात सुमारे 50 हून अधिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. ही सर्व खाजगी क्षेत्र अथवा विविध संस्थांच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक केंद्रात सुमारे 00 पेशंट गृहीत धरण्यात आली आहेत. या प्रत्येक पेशंटमागे ठाणे महापालिका 100 रुपये देणार आहे. तसेच सुमारे 25 पेशंटच्या वेगवेगळ्या टेस्ट अपेक्षित आहेत. ज्यांची किमत 325 प्रमाणे आकारण्यात आली आहे. अशा प्रमाणे वर्षाला सुमारे 28 कोटी रुपये या आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत. ही योजना महाराष्ट्र शासनाचीच असून ती फक्त ठाणे महानगर पालिका राबवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

26 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्राला सकाळच्या सत्रामध्ये किमान 52 आरोग्य केंद्रांची गरज आहे. आपल्याकडे केवळ 27 सेंटर आहेत. यामुळे आरोग्य केंद्रावर प्रचंड लोड येत असल्यामुळे ही केंद्र उभी राहणे गरजेचे आहे. प्रस्तावित 50 आरोग्य केंद्र ही संध्याकाळच्या वेळेसही खुली राहणार असल्याने याचा फायदा कामगार वर्गाला होणार असे स्पष्टीकरण आरोग्य अधिकारी आर.टी.केंद्रे यांनी दिले.

- Advertisement -

या प्रकल्पावर बोलतांना आयुक्त म्हणाले, ‘ठाणे शहराला या योजनेची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र हा प्रकल्प मंजुर करताना ज्या प्रभागात याची गरज असेल ज्या प्रभागातील नगरसेवक यांची मागणी करतील त्याच प्रभागात ही आरोग्य केंद्र उभारण्यात येतील. अन्य ठिकाणी ही केंद्र उभारण्यात येणार नाहीत. तसेच या आरोग्य केंद्रांच्या खर्चाविषयी पुन्हा एकदा तपासणी करण्यात येईल. निविदामधून जी संस्था अथवा कंपनी आपल्याला उत्तम सेवा आणि कमी किमत देईल अशांचाच विचार करण्यात येणार आहे. मात्र ठाणेकरांच्यासाठी ही आरोग्य केंद्र अर्थात आपला दवाखाना अतिशय गरजेची बाब आहे. ’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -