घरमुंबईठाणे पोलिसांची दुहेरी भूमिका : कुठे मार, तर कुठे अन्नदान!

ठाणे पोलिसांची दुहेरी भूमिका : कुठे मार, तर कुठे अन्नदान!

Subscribe

एकिकडे लाठीमार देत असतानाच दुसरीकडे गाेरगरीब आणि अडकून पडलेल्या नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची सोय ठाणे पोलिसांकडून केली जात आहे.

करोनाचा प्रादुभाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र तरीसुद्धा काही नागरिक घराबाहेर फिरत आहेत. त्या नागरिकांना पोलिसांकडून चांगलाच लाठीचा मार बसत आहे. मात्र एकिकडे लाठीमार देत असतानाच दुसरीकडे गाेरगरीब आणि अडकून पडलेल्या नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची सोयही पोलिसांकडून केली जात आहे. त्यामुळे कायदा मोडणाऱ्यांना लाठीचा मार देत असतानाच ठाणे जिल्ह्यातील पोलिसांकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. मात्र शासनाच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात लॉक डाऊन करण्यात आला आहे. तरीसुद्धा काही नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत. कोणी दुचाकी तर कोणी चारचाकी घेऊन फिरत आहेत. त्यांना विनवणी करूनही नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांकडून लाठीचा प्रसाद दिला जात आहे. पोलिसांकडून लाठीचा प्रसाद मिळत असल्याने काहींनी त्याच्या या कृतीला तीव्र विरोध दर्शवून त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. मात्र जनतेच्या जीवासाठीच पोलीस हे करत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! २ महिन्यांत १५ लाख आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात आले

एकिकडे पोलिसांवर टीका होत असतानाच दुसरीकडे मात्र पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शनही होत आहे. हॉटेल आणि खानावळ बंद असल्याने गोरगरीब तसेच रस्त्यावरील लोकांना जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दोन वेळच्या मोफत जेवणाची सोय कल्याणच्या वाहतूक पेालिसांकडून करण्यात आली आहे. गोरगरीब नागरिकांशिवाय गावावरून आलेले किंवा जाणाऱ्या नागरिक अडकून पडले आहेत. त्यांनाही मोफत जेवण दिले जात आहे. कल्याणच्या वाहतूक शाखेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील आणि स्वामी नारायण ट्रस्ट यांच्या माध्यमातून गोरगरीबांना दररोज दोन वेळेचा जेवण आणि पाण्याची बॉटल देऊन पोलिसांकडून स्तुत्य उपक्रम राबवत आहेत. ठाणे उल्हासनगर, डोंबिवली, भिवंडी आदी पोलिसांकडून मोफत अन्न वाटप केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -