घरमुंबईसामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी ठरल्या देवदूत

सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी ठरल्या देवदूत

Subscribe

३१ मार्च २०१९ पर्यंत या २७ रुग्णवाहिका ५८११ अपघात स्थळी धावून तेथील १२४५० जखमींचे प्राण वाचवण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत.

राज्यातील प्रमुख राज्यमार्गावर जखमींसाठी मोफत ठेवण्यात आलेल्या नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिका तत्परतेने सेवा देत असून रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवण्याचे काम करत आहेत. यामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती संस्थेचे ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक नाईक यांनी दिली आहे. संस्थानतर्फे महाराष्ट्राच्या हद्दीत पाच महामार्गावर २०११ पासून सुरु केलेल्या मोफत रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरल्या आहेत. ३१ मार्च २०१९ पर्यंत या २७ रुग्णवाहिका ५८११ अपघात स्थळी धावून तेथील १२४५० जखमींचे प्राण वाचवण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत. संस्थानच्या रुग्णवाहिकांशी संपर्क साधण्याकरता ८८८८२६३०३० ही मोबाईल क्रमांक सेवा सुरु आहे.

महाराष्ट्राच्या हद्दीतील ५ महामार्गावर २७ रुग्णवाहिका २४ तास तत्पर सेवेत आहेत. महामार्गावरील अपघातांची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमी रुग्णांना जवळच्या सरकारी रुग्णालयात पोहचवतात. त्यामुळे अपघातग्रस्तांची तात्काळ सोय झाली आहे. आजपर्यंत ५८११ अपघातात १२४५० जखमींना आधार मिळाला आहे. त्यामुळे अनेक गंभीर जखमींना पुर्नजन्म मिळाला, अशी माहिती अशोक नाईक यांनी दिली आहे.

- Advertisement -
  • मुंबई-गोवा महामार्ग – ३७५०
  • मुंबई-आग्रा महामार्ग – ३७४४
  • मुंबई-हैद्राबाद महामार्ग – १८७५
  • मुंबई – अहमदाबाद महामार्ग – २१२३
  • पुणे-बंगलोर महामार्ग – ९९३

हेही वाचा –

‘त्या’ अधिकाऱ्याला शोधून काढा – नितेश राणे

मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -