घरमुंबईअदाणींचा शॉक; ३ लाख ग्राहकांना अंदाजे वीजबिले

अदाणींचा शॉक; ३ लाख ग्राहकांना अंदाजे वीजबिले

Subscribe

तीन लाख ग्राहकांना अंदाजे वीजबिले

मुंबई उपनगराला वीजपुरवठा करणार्‍या रिलायन्स एनर्जीला ऑगस्ट २०१८मध्ये टेकओव्हर करून अदाणी इलेक्ट्रिसिटी, मुंबई, लिमिटेड (एईएमएल) कंपनीने आपली सुरुवात अत्यंत शॉकिंग अशा स्वरुपाची केल्यामुळे ग्राहकांवर गारद व्हायची वेळ आली आहे. अदाणींच्या कंपनीने पाठवलेली वीजबिले पाहून मुंबईकरांचे डोळे पांढरे झाले आहेत. दोन कंपन्यांमधील मालमत्ता हस्तांतरणाच्या कारभारात लाखो वीज ग्राहकांना फुगलेल्या दराची बिले अंदाजे ठोकून देण्यात आली आहेत. जवळपास तीन लाख वीज ग्राहकांना अदाणींच्या वीज वितरण कंपनीने धक्कादायक अंदाजे वीजबिले पाठवल्याची माहिती आहे. वीज मीटर रिडिंगसाठी कर्मचारीच फिल्डवर न गेल्याने हा प्रकार ऑगस्ट महिन्यातील बिलाच्या माध्यमातून समोर आला आहे. मुंबई उपनगरात सायन ते मानखुर्द तसेच वांद्रे ते मीरा-भाईंदर या भागातील २८ लाख वीज ग्राहकांना एईएमएलमार्फत वीज पुरवठा केला जातो.

रिलायन्स एनर्जी आणि एईएमएल या कंपन्यांमध्ये मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत घडली. या कालावधीत तीन लाख मीटरचे रिडिंग घेण्यासाठी प्रत्यक्ष कर्मचारी घरोघरी गेलेच नाहीत. त्यामुळे अदाणींकडून २८ लाख ग्राहकांपैकी ३ लाख ग्राहकांना अंदाजे वीजबिले पाठविण्यात आली. कर्मचारी उपलब्ध नसल्याने ही अंदाजे वीजबिले पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दोन कंपन्यांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेदरम्यान कामगारांनी सहकार्य केले नाही. संपाचा पवित्रा घेतल्यानेच मीटर रिडिंग न घेता अंदाजे वीजबिले पाठवण्याची वेळ आल्याची कुरबुर एईएमएलच्या अधिकार्‍यांकडून ऐकायला मिळाली.

- Advertisement -

आरोप प्रत्यारोप

कंत्राटी कामगारांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या, ही मागणी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने अदाणी व्यवस्थापनाकडे लावून धरली होती. या कालावधीत नव्या व्यवस्थापनाच्या अधिकार्‍यांनी, कामगारांना कामच दिले नाही. मुंबईकरांना अंदाजे वीजबिले पाठवणे हे नव्या व्यवस्थापनाचे अपयश असल्याचा ठपका मुंबई इलेक्ट्रिसिटी वर्कर्स युनियनचे महासचिव विठ्ठल गायकवाड यांनी ठेवला आहे. कामगारांनी कोणताही संप केला नव्हता, असे सांगत कामगारांची बाजू त्यांनी स्पष्ट केली आहे.

- Advertisement -
एईएमएलकडून स्पष्टीकरण
ऑक्टोबर हिटचा परिणाम

ग्राहकांचे वीजदर हे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून निश्चित केले जातात. ही प्रक्रिया जनसुनावणीच्या माध्यमातून तसेच पारदर्शकपणे राबविण्यात येते. मुंबईकरांची ऑक्टोबरमध्ये वाढलेली वीजबिले ही ऑक्टोबर हिटचा परिणाम आहे. ऑक्टोबर हिटमुळे सरासरी वीजबिल १८ टक्क्यांनी वाढले असल्याचे स्पष्टीकरण एईएमएलच्या प्रवक्त्याने दिले.

आश्वासन कागदावरच

१ सप्टेंबरला एईएमएल आणि मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनची बैठक झाली. या बैठकीत कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचा निर्णय दोन महिन्यात घेऊ, असे लेखी आश्वासन एईएमएलकडून देण्यात आले. पण दोन महिन्यात हा प्रश्न सुटलेला नाही, असे गायकवाड यांनी सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -