Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुख्यंमंत्र्यांनी पुन्हा टाळले राजभवनाचे हेलिपॅड, हवाई उड्डाण महालक्ष्मी रेसकोर्सवरुन

मुख्यंमंत्र्यांनी पुन्हा टाळले राजभवनाचे हेलिपॅड, हवाई उड्डाण महालक्ष्मी रेसकोर्सवरुन

रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्समधील हेलिपॅडचा वापर राजभवनावरील हेलिपॅडचा वापर टाळला

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा (सोमवार,२२ फेब्रुवारी) रायगड दौऱ्यावर जात आहेत. यावेळीही त्यांनी राजभवनावरील हेलिपॅडचा वापर करणे टाळले आहे. रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्समधील हेलिपॅड सोमवारी दुपारी वापर करणार आहेत. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी (११ फेब्रुवारी) उत्तराखंडमध्ये असलेल्या नियोजित कार्यक्रमास जाण्यासाठी राज्य सरकारने काही तांत्रिक बिघाडाचे कारण देत विमान सेवा नाकारली होती. यामुळे राज्यपालांना सरकारी विमानातून पायउतार व्हावे लागले होते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर दौऱ्यावेळी (शुक्रवार,१२ फेब्रुवारी) विमान प्रवास केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या विमानाने महालक्ष्मी रेसकोर्सवरील हेलिपॅडवरुन उड्डाण केले. मुख्यमंत्री राजभवनाच्या खासगी विमानाचा वापर करतात परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी असलेल्या विसंवादामुळे मुख्यमंत्र्यांनी राजभवनावरील हेलिपॅडचा वापर करणे टाळले आहे.

राज्याचा गाडा हाकण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात संवाद होणे आवश्यक आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकारे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात विसंवाद दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळेच राज्यपाल कोश्यारींना मसूरीसाठी प्रवास करण्यास विमान सेवा नाकारली असे काहींचे मत आहे. राज्यपालांना ११ फेब्रुवारीला विमान प्रवास नाकारले त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ फेब्रुवारीला आपल्याला राजभवनावरुन विमान प्रवास करण्यास परवानगी देतील का? अशा प्रश्नामुळे आणि सनदी आधिकाऱ्याने दिलेल्या सल्ल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजभवनावरील हेलिपॅडचा वापर करणे टाळल्याचे समजते.


- Advertisement -

हेही वाचा : राज्यपालांचा विमानातून पायउतार, ठाकरे सरकारचा ‘प्रीप्लॅन’


तसेच मागील १० दिवसांत मुख्यमंत्र्यांनी २ वेळा हवाई प्रवास केला यामध्ये दोन्ही वेळी राजभवनावरील हेलिपॅडचा वापर करणे टाळले आहे. वर्षा निवासस्थान ते राजभवन अवघ्या १० मिनिटांचे अंतर आहे तर महालक्ष्मी रेसकोर्सकडे जाण्यास अधिक वेळ लागतो असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावरील हेलिपॅडचा वापर टाळला आहे. आजही (सोमवारी,२२ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकेरेंचे खासगी विमान महालक्ष्मी रेसकोर्सयेथून उड्डाण करणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकरही खासगी विमानात त्यांच्यासोबत उपस्थित असतील.

- Advertisement -

विधानसभा अधिवेशन येत्या १ मार्चपासून होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार असे पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले होते. राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन १ मार्चपासून सुरु होत आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचा कार्यभार उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष कधी नेमणार अशी विचारणा ठाकरे सरकारकडे पत्र लिहून केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रायगड जिल्हा दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे

१२.१७वा. वर्षा निवासस्थान येथून मोटारोने महालक्ष्मी रेसकोसंकडे प्रयाण
१२.२०वा. महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड येथे आगमन
१२.२५ वा. खासगी विमानाने जनता विद्यालय पटांगण हेलिपॅड, वासंबे. ता.खालापूर. जि. रायगडकडे प्रयाण
१२.४५ वा. जनता विद्यालय पटांगण हेलिपॅड, वासंबे, ता. खालापूर, जि. रायगड येथे आगमन
१२.५०वा. मोटारीने भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, ता.पनवेलकडे प्रयाण
०१.००वा. भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, ता,पनवेल येथे आगमन
०९.००वा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या विद्यमाने न्हावाशेवा टप्पा-३ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ (ओ.गुलाबराव पाटोल. मंत्रो/श्री. किशोर राजे निंबाळकर. सदस्य सचिव, म. जो. प्रा. ९९२००४४१२५)
०२.०७वा, मोटारोने जनता विद्यालय पटांगण हेलिपॅड, वासंबे, ता. खालापूर, जि. रावगडकडे प्रयाण
०२.१७वा. जनता विद्यालय पटांगण हेलिपॅड, वासंबे. येथे आगमन
०२.१५ वा. हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण
०२.३५ वा. महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपंड, मुंबई येथे आगमन
७२.४७ वा. मोटारीने प्रयाण

- Advertisement -