घरमुंबईCoronaVirus: आता कोरोनाबाधित मृतदेहाचा पंचनामा होणार नाही

CoronaVirus: आता कोरोनाबाधित मृतदेहाचा पंचनामा होणार नाही

Subscribe

इंक्वेस्ट न करण्याचे आदेश गृह विभागाने दिल्याने डॉक्टर, नर्स आणि पोलिसांना दिलासा

कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्याने डॉक्टर, नर्स आणि पोलिसांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आता कोरोनाबाधित संशयित मृत व्यक्तीच्या शरीराचा पंचांसमोर करण्यात येणाऱ्या पंचनामा (इंक्वेस्ट) न करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे डॉक्टर, नर्स आणि पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या संशयित मृत व्यक्तीची पोलिसांकडून इन्क्वेस्ट करण्यात येते. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या मृत व्यक्तींचा इंक्वेस्ट करण्यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस यांना कोरोना संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृत व्यक्तींचे इंक्वेस्ट न करण्याची मुभा गृह विभागाकडून पोलीस यंत्रणेला दिली आहे. हा आदेश साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील भाग २ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार राज्यात निर्बंध अस्तित्त्वात असे पर्यंत हा कायदा लागू राहणार आहे.

- Advertisement -

इंक्वेस्ट पंचनामा म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यापूर्वी मृत शरीराचा पंचासमोर करण्यात येणाऱ्या पंचनाम्याला इंक्वेस्ट पंचनामा असे म्हणतात. इंक्वेस्ट मध्ये मृत व्यक्तीच्या शरीरावरील जखमा, व्रण, शरीरावरील चिन्ह याची नोंद केली जाते जेणेकरून शवविच्छेदनानंतर अथवा मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्तीकडून होणाऱ्या आरोपानंतर इंक्वेस्टचा उपयोग होतो.


CoronaVirus: कस्तुरबात अत्याधुनिक आयसोलेशन वॉर्डाच्या स्वतंत्र इमारती होणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -