घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटअखेर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनवरील निर्यातबंदी उठवली! पण...

अखेर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनवरील निर्यातबंदी उठवली! पण…

Subscribe

कोरोना रुग्णांसाठी प्रभावी समजल्या जाणाऱ्या अँटी-मलेरिया औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी भारताने
अंशतः उठवली आहे. देशांतर्गत गरजांची पूर्तता केल्यावरच कोरोना विषाणूच्या साथीने पीडित देशांच्या मागणीनुसार हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आधी देशातल्या रुग्णांना ते उपलब्ध करून द्यावे आणि नंतर इतर देशांचा विचार करावा, अशी मागणीवजा टीका विरोधकांकडून
करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, यावरून कोणत्या देशात किती पुरवठा होईल हे अद्याप ठरलेले नाही. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाच्या निर्यातीवरील बंदी अंशतः काढून टाकण्यात आली असली तरी पॅरासिटामोलच्या निर्यातीवर बंदी घातली जाईल. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारत संभाव्य परिस्थितीचा विचार करून देशातील लोकसंख्येसाठी औषध साठवून ठेवत आहे. अमेरिका सतत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाची मागणी भारताकडून करत आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या पुरवण्यास सांगितले होते.

- Advertisement -

कोणत्या देशांना निर्यात होते?

भारतातून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध घेणाऱ्यांमध्ये अमेरिका, ब्राझील, रशिया, इस्राईल, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, अबू धाबी इत्यादींचा समावेश आहे.

२५ मार्च रोजी निर्यातीवर घातली होती बंदी

कोविड -१९ रूग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध उपयोगी आहे का? याची चाचणी सध्या सुरु आहे. तरीही ते प्रभावी असल्याचे मानले जाते. भारत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन उत्पादक देशांपैकी एक आहे, जो मलेरियासाठी वापरला जातो. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियासाठी अनेक दशकांपूर्वीचे औषध आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) २५ मार्च रोजी या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -