घरमुंबई'डॉक्टर आणि रुग्णांचा संवाद पारदर्शी असणं गरजेचं'

‘डॉक्टर आणि रुग्णांचा संवाद पारदर्शी असणं गरजेचं’

Subscribe

मुंबई सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलमध्ये डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर नायर हॉस्पिटलमधील मार्ड संघटनेतर्फे शनिवारी डॉक्टरांसाठी एका विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलांचा परिणाम त्यातून डॉक्टरांवर येणारा ताण याविषयी चर्चा करण्यात आली.

सरकारी आणि पालिका हॉस्पिटलमधील वाढते रुग्ण, त्यांच्यासोबत डॉक्टरांचा वाढता ताण आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून होणारा छळ या सर्व महत्त्वाच्या विषयांवर बोलणं गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, डॉक्टर आणि रुग्णांचा संवाद पारदर्शी असायला हवा, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. मुंबई सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलमध्ये डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर नायर हॉस्पिटलमधील मार्ड संघटनेतर्फे शनिवारी डॉक्टरांसाठी एका विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलांचा परिणाम त्यातून डॉक्टरांवर येणारा ताण याविषयी चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे बाल कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. एस.डी. बनावली, केईएम हॉस्पिटलच्या मानसोपचारतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर, राजीव गांधी हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध मलगावकर आणि मध्यवर्ती मार्डचे माजी अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांचा सहभाग होता.

‘डॉक्टरांनी किमान दर सहा महिन्यांनी मानसिक आणि शारिरीक तपासणी करायला हवी’

केईएम हॉस्पिटलचे मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितलं की, ‘कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाला छळ असे लेबल दिले जाऊ शकते. पण, प्रतिक्रियेवर याचा परिणाम अवलंबून आहे. पण, तो कोणत्याही प्रकारचा छळ सहन करणे चुकीचे आहे. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरांनी परस्परांमधील संवाद कौशल्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.’ तसंच ‘सतत कामाच्या दगदगीत अडकलेल्या डॉक्टरांची किमान दर सहा महिन्यांनी मानसिक आणि शारिरीक तपासणी केली गेली पाहिजे. या नियमांची पूर्तता गेली चार वर्षे झालीच नसल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चार वर्षांपूर्वी सर्व सरकारी आणि पालिका वैद्यकीय महाविद्यालयांना निवासी डॉक्टरांच्या शारिरीक आणि मानसिक तपासणीचे आदेश दिले होते. हे आदेश राज्यातील एकाही हॉस्पिटलने पाळले नाहीत, अशी खंत मार्डचे माजी अध्यक्ष आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केली.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -