घरमुंबईप्रसुतीनंतर पती भेटायला आला नाही मुलाला टाकून महिलेचे पलायन

प्रसुतीनंतर पती भेटायला आला नाही मुलाला टाकून महिलेचे पलायन

Subscribe

अंधेरीतील सातबंगला येथील घटना; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसुतीनंतर पत्नीसह मुलाला भेटायला पती आला नाही म्हणून रागाच्या भरात एका महिलेने तिच्या पाच दिवसाच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन केल्याची घटना गुरुवारी दुपारी अंधेरीतील सातबंगला परिसरात उघडकीस आली. मात्र काही तासांतच वर्सोवा पोलिसांनी पळून गेलेल्या महिलेचा शोध घेतला आणि तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कौटुंबिक वादामुळे पाच दिवसांच्या मुलाला टाकून पळून गेल्याची कबुली त्या महिलेने दिली आहे.

अंजू ही अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहते. पाच दिवसांपूर्वीच तिने कूपर रुग्णालयात एक मुलाला जन्म दिला होता. मात्र प्रसुतीनंतर तिचा पती तिच्यासह तिच्या बाळाला भेटायला आला नाही याचा तिला प्रचंड राग होता. त्यामुळे तिने तिच्या बाळाला सात बंगला येथील नाना-नानी पार्कजवळील एका रिक्षात ठेवून पलायन केले होते. मुख्य नियंत्रण कक्षातून ही माहिती प्राप्त होताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या बाळाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी पोलिसांनी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी बेवारस बाळ मिळाल्याची नोंद करुन तपासाला सुरुवात केली. कूपर रुग्णालयात एका महिलेने पाच दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. तिला नंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अंजू असे त्या महिलेचे नाव असून ती अंधेरीतील वर्सोवा गावात राहते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या मुलाच्या पालकांचा शोध सुरु केला होता.

अंजू या महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता आपणच मुलाला रिक्षात ठेवून पलायन केले होते. प्रसुतीनंतर मला आणि बाळाला भेटायला पती आला नाही. त्याचा प्रचंड राग तिला होता. या रागापोटी तिने बाळा रिक्षात ठेवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आले आहे. तिच्याविरुद्ध नंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मात्र या गुन्ह्यात तिला अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -