घरमुंबईई-सिगारेट, पेन हुक्काच्या विक्रीवर एफडीएकडून बंदी

ई-सिगारेट, पेन हुक्काच्या विक्रीवर एफडीएकडून बंदी

Subscribe

मुंबईत सर्रास आढळणाऱ्या पेन हुक्का, ई-सिगारेट्सच्या विक्रीवर एफडीएकडून बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत सर्रास आढळणाऱ्या पेन हुक्का, ई-सिगारेट्सच्या विक्रीवर एफडीएकडून बंदी घालण्यात आली आहे. ई-सिगारेट्स आणि तत्सम पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान मुंबईतील तरुण पिढी ई-सिगारेटच्या विळख्यात अडकेल्याचे आढळून आले. त्यामुळे या पदार्थांविरोधात एफडीएकडून विशेष मोहिम राबवण्यात आली आहे.

ई-सिगारेट्स, पेन हुक्का यांसारख्या पदार्थांची विक्री ऑनलाईन मार्केटमध्येही केली जाते. त्यासाठी अशा ऑनलाईन पोर्टलवरील विक्रीवरही प्रतिबंध घालण्यात येणार आहे. ई-सिगारेटमध्ये असलेले निकोटीन आणि ऑर्गेनिक व्होलाटाईल सॉलवल्ट हे आरोग्याला अपायकारक घटक असल्यामुळे एफडीएने बंदी घातली आहे.

- Advertisement -

ई-सिगारेटमध्ये निकोटीन आणि ऑरगॅनिक व्होलाटाईल सॉल्व्हट हे मानवी आरोग्यास अपायकारक घटक असल्याने सार्वजनिक आरोग्य हिताच्या दृष्टीने ई-सिगारेटची आणि तत्सम पदार्थांची विक्री करु नये अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल.
– डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)

नियमित सिगारेटच्या ऐवजी ई-सिगारेटचा वापर पर्याय म्हणून केला जातो. यात असलेले निकोटीनचे नियमित सेवन आरोग्यास हानिकारक आहे. त्यानुसार, या पदार्थांची ५ मार्च २०१९ च्या परिपत्रकाद्वारे राज्यात अशा उत्पादनांची विक्री किंवा वितरण होणार नसल्याच्या सुचना एफडीएकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

एफडीएकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत मुंबईतील वांद्रे, अंधेरी, गोरेगावमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. वांद्र्यातील ईझी स्मोक, हिलरोड वांद्रे (प.) यांच्याकडे ज्यूल ब्रँडची ई-सिगारेटचा एक लाखांचा साठा जप्त करण्यात आला.  ज्यूल ब्रँड हे अमेरिका आणि इंग्लड या देशात विक्रीसाठी असतात. गॉडफ्रे फिलीप्स इंडिया या कंपनीकडून १.२३ लाखांचा वेप्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच, राज्यात राबवलेल्या मोहिमेत ७४ पेढ्यांच्या तपासण्या केल्या असून त्यात पान स्टॉल, किरकोळ घाऊक विक्रेत्याचा समावेश आहे.

हेही वाचा –

अखेर तिसऱ्या दिवशी दिव्यांशचा शोध थांबवला

हाफकिनमध्ये होणार औषधगोळ्यांची निर्मिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -