घरमुंबईआरोग्य विभाग म्हणतंय राज्यात लेप्टोचे दोनच बळी!

आरोग्य विभाग म्हणतंय राज्यात लेप्टोचे दोनच बळी!

Subscribe

राज्यात लेप्टोमुळे केवळ २ जणांचा मृत्यू झाला असून लेप्टोचे राज्यभरात २६ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र आतापर्यंत मुंबईतच लेप्टोचे ५ बळी गेले आहेत.

एकीकडे राज्यामध्ये लेप्टोने थैमान घातले असताना मात्र राज्याच्या आरोग्य विभागाकडे लेप्टोमुळे २ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यात लेप्टोमुळे केवळ २ जणांचा मृत्यू झाला असून लेप्टोचे राज्यभरात २६ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. फक्त मुंबईमध्ये जुलै महिन्यात पाच लेप्टोचे बळी गेले असतानाही राज्याचा आरोग्य विभाग राज्यात केवळ दोन लेप्टोचे बळी गेल्याचं सांगत आहे. त्यामुळे

मुंबईत जुलै लेप्टोचे ५ बळी 

एकीकडे राज्याचा आरोग्य विभागाकडे राज्यामध्ये लेप्टोमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन जरी सांगण्यात येत असली तरी मुंबईमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, लेप्टोमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जुलै २०१८ मध्ये ९७ लेप्टोच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, २०१७ च्या जुलै महिन्यात ५९ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. लेप्टोच्या रुग्णांमध्ये ७६ टक्के पुरुष आणि २४ टक्के महिलांची संख्या आढळली आहे. लेप्टोंच्या मृतांमध्ये १७ , २१ आणि २७ वर्षीय मुलांचा ही समावेश आहे. त्यामुळे पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालताना, खेळताना अंगावर जर जखम झाली असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे. शिवाय, स्वच्छता राखण्याचं ही आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

राज्यात डेंग्यूचेही थैमान 

पावसाळ्यात गेल्यावर्षी राज्यातमध्ये थैमान घातलेल्या डेंग्यूने यावर्षी देखील आपले तोंड उघडले आहे. आतापर्यंत डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे तर राज्यभरात १०९१ संशयित रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. डेंग्यूसोबतच मलेरियाचे देखील ३०९८ रुग्ण राज्यात असल्याची माहिती आरोग्यविभागाकडून मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -