घरमुंबईठाण्याने मुंबईला मागे टाकले!

ठाण्याने मुंबईला मागे टाकले!

Subscribe

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली

कोरोनाने ठाणे जिल्ह्यात हाहाःकार उडवला असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे चिंताग्रस्त वातावरण आहे. सहा महापालिका आणि दोन नगर परिषद असलेल्या या जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २५ हजारांच्या संख्येत गेली आहे. मुंबईची हीच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४ हजारांच्या संख्येत असताना ठाण्याने त्यांना मागे टाकल्याने राज्य सरकार आणि प्रशासन धास्तावले आहे.

मुंबईत धारावी आणि वरळीत कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुंग्णांची संख्या कमी करण्यात यश आले असताना ठाण्यात मात्र हा आकडा कमी होत नसल्यामुळे आता भीती निर्मण होऊ लागली आहे. या जिल्ह्यातील महापालिकांचे आयुक्त बदलून प्रशासनाच्या पातळीवर वेगात निर्णय घेऊन काही फरक पडतो का याची चाचपणी करण्यात आली. मात्र काही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांच्या सूचना

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढविण्याबरोबरच महापालिकांच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा दर्जा राखा तसेच त्या ठिकाणावरून लोकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या अशा सूचना राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री . आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांना दिल्या.

दरम्यान यावेळी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने बनविण्यात आलेल्या ानलाईन बेड अलोकेशन व मेब्युलन्स बुकिंग सिस्टम पचे . आदित्य ठाकरे यांचे शुभहस्ते अनावरण करण्यात आले. तसेच त्यांच्यावतीने प्रत्येक महापालिकांना ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले, आदित्य ठाकरे आणि ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालय येथे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक आणि ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भायंदर महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

- Advertisement -

बैठकीच्या सुरूवातीस ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि मीरा भायंदर महापालिकेच्या वतीने कोरोना कोवीडचबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीत बोलताना राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसींग करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर चाचणीची क्षमताही वाढविण्याच्या सूचना दिल्या.ठाण्यातील कोवीड रूग्णालये, विलगीकरण कक्ष, रूग्णांना रूग्णांना पुरविण्यात येणारे वैद्यकीय व्यवस्थापन, डॉक्टर्स आणि इतर मनुष्यबळ, रूग्णांना देण्यात येणारे भोजन, रूग्णवाहिका सेवा आदींचा आढावा घेतला. तसेच त्यांच्यावतीने प्रत्येक महापालिकांना प्रत्येकी पाच ाक्सीजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिकांनी मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसींग करून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवावे अशा सूचना केल्या. क्वारंटाईन सेंटरमधून रूग्णांच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -