घरमहाराष्ट्रनाशिकयेवला तालुक्यात कोरोनाबाधितांनी ओलांडली शंभरी

येवला तालुक्यात कोरोनाबाधितांनी ओलांडली शंभरी

Subscribe

१ लाख १९ हजार १७३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रुग्णसंख्येवर नियंत्रण आले असताना नागरिकांचा बेजबाबदारपणा परत रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.कोरोनाने तालुक्यात पुन्हा डोके वर काढले आहे. ग्रामीण भागातील ३५ गावांना पुन्हा कोरोनाने विळखा घातल्यामुळे नागरिक पुन्हा भयभीत होत आहे.विशेष म्हणजे शहरात सध्या केवळ दोन रुग्ण आहेत.

दोन आठवड्याांपूर्वी तालुक्याची रुग्णसंख्या ३० च्या खाली होती, आज हाच आकडा शंभरावर पोहोचला आहे. तालुक्यातील धुळेगाव हे हॉटस्पॉट बनले आहे. तालुक्यातील रुग्णसंख्या शंभरी पार पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे. आत्तापर्यंत २८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून येवल्यातील एकूण बेधितांची संख्या ५९९७ असून, कोरोनावर ५६११ जणांनी मात करत घरवापसी केली आहे. तर उर्वरित १०३ रुग्ण उपचार घेत आहेत. १० गावांत २० वर्षांखालील २० मुले कोरोनाबधित आढळल्याने प्रशासनाची चिंता अजूनच वाढली आहे.

- Advertisement -

प्रशासनाकडून जनजागृती, लसीकरण व उपाययोजना सुरू असून आजपर्यंत १ लाख १९ हजार १७३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे व सद्या वेगाने सर्वच ठिकाणी लसीकरण होत असून, लवकरच पूर्ण होईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्मद नेहते व विस्तार अधिकारी आर. एस. खैरे यांनी सांगितली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -