घरमुंबईपोलिसांकडून महिलेवर घृणास्पद अत्याचार, गृहमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

पोलिसांकडून महिलेवर घृणास्पद अत्याचार, गृहमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

Subscribe

जळगाव महिला अत्याचार प्रकरणावरुन विरोधक आक्रमक

जळगावातील आशादीप महिला शासकीय वसतिगृहातील महिला आणि मुलींना निर्वस्त्र होऊन डान्स करण्यास सांगितले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर विधानपरिषदेत विरोधी पक्षाकडून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. विरोधकांच्या मागणीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात ४ उच्चस्तरीय महिलांची टीम तयार करण्यात आली असल्याचे सांगितले तसेच तात्काळ संबंधित आरोपींवर कारावई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात संवेदनशीलतेने तात्काळ कारावाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांची, बहिणींची इज्जत ठेवणार आहे का त्यांना आपले संरक्षण स्वतःच करावे लागणार आहे असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनीही विशेष समिती स्थापन करुन अहवाल लवकरात लवकर सभागृहासमोर स्थापन करण्याची मागणी केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आरोपींवर तात्काळ कारावाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात असे सांगितले आहे की, जळगावमध्ये घटना घडली आहे. ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. यावर ४ उच्चस्तरीय महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापित करण्यात आली आहे. ही समिती सखोल तपास करुन २ दिवसांत अहवास सादर करेल. या प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई केली जाईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

जळगावमधील महिलांवरील अत्याचार प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत. विधानसभेत भाजप आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा उपस्थि केला. आमदार श्वेता महाले यांनी या प्रकरणाती दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्या पोलिसांचे निलंबन करावे अशीही मागणी श्वेता महाले यांनी गृहमंत्र्यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -