घरमुंबईआघाडी सरकार मधील 'त्या' आमदारांची चौकशी झालीच पाहिजे – प्रविण दरेकर

आघाडी सरकार मधील ‘त्या’ आमदारांची चौकशी झालीच पाहिजे – प्रविण दरेकर

Subscribe

कोर्टात याचिका सुरू असताना तो मुलगा अचानक गायब झाला

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी माजी वन मंत्री संजय राठोड यांचं प्रकरण ताजं असताना, आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी सरकारमधील आणखी एका आमदाराचा पर्दाफाश केला आहे. राज नावाचा एक मुलगा असून माझ्या वडिलांची डीएनए टेस्ट करावी, अशी याचिका या मुलाने कोर्टात केली आहे. हा प्रकार कायदा सुव्यवस्थेला शोभणारा नसून तो लज्जास्पद आहे, असे सांगत दरेकरांनी विधानपरिषदेत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आघाडीच्या एका आमदाराच्या डीएनए टेस्टची मागणी आज दरेकर यांनी सभागृहात केली. या प्रकरणा विषयी दरेकर यांनी सांगितले की, आघाडीच्या एका आमदाराच्या डीएनए टेस्टचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या आमदाराची पत्नी आणि अपत्य बाहेर आहेत.

कोर्टात याचिका सुरू असताना तो मुलगा अचानक गायब झाला. त्यानंतर शोध घेतल्यावर कळले की सूरत येथील सागर नाव्याच्या लोकप्रतिनिधीच्या मित्राकडे नेण्यात आले होते. या मुलाला मारहाणही केली असुन जिवेमारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्या मुलाच्या आईने तक्रार केली परंतु ती तक्रार घेण्यात आलेली नाही. त्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला, व्यसनाधीन झाला, सत्तेच्या जोरावर आज त्या आमदार विषयी कारवाई नाही, कोर्टात विषय प्रलंबीत आहे. या आमदारावर कारवाई झालीचं पाहिजे तसेच त्या महिलेला व त्या मुलाला संरक्षण द्यावे, अशी मागणी दरेकर यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -