घरमुंबईमहिलांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी घेतली राज्यपालांची भेट

महिलांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी घेतली राज्यपालांची भेट

Subscribe

बीड जिल्हा बँकप्रकरणी कोर्टात जाऊ

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यापालांशी राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच जळगावमध्ये झालेल्या महिला अत्याचाराबाबतही राज्यपालांशी चर्चा केली तसेच बीड जिल्हा बँकेच्या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. बीड जिल्ही बँकेच्या निवडणुक सुरु होत आहे. यामध्ये आमच्या सर्वांचे फॉर्म अपात्र ठरवल्या गेल्याने अन्याय झाला आहे. निवडणूक लढण्यापासून रोखूण प्रशासक आणण्याचे कारस्थान पालकमंत्री आणि सत्ताधाऱ्यांकडून सुरु असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे.

जळगाव महिला अत्याचार प्रकरणावर चर्चा

राज्या महिलांवरील अन्यायाच्या घटनांत वाढ होत आहे. महिलांवरील वाढते अन्याय हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. महिलांना आवाज उठवण्याची संधी मिळेल का नाही याबाबत चर्चा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी केली आहे. जळगाव वसतिगृह घटनेबाबत खंत वाटत आहे. राज्य सरकारमधील लोकं चांगले वागत नसतील तर लोकांना तुम्ही कशी शिस्त लावणार असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी लोकं चांगले वागत नसतील तर अधिकारीही तसेच वागणार आहेत. मी सभागृहाच्या बाहेरुन हा विषय लावून धरणार असल्याचेही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

बीड जिल्हा बँकप्रकरणी कोर्टात जाऊ

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणतीही तक्रार आणि कोणतेही कारण नसताना आम्ही भरलेले फॉर्म हे निवडणुक अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहेत. याबाबत सहकार मंत्र्यांशीही चर्चा केली आहे. त्यांना यविषयी लवकरात लवकर निर्णय देण्याची मागणी केली आहे, जणेकरुन आम्ही न्यायालयात जाऊ शकतो जर सहकारमंत्र्यांनी चांगला निर्णय दिला तर त्याचे आम्ही स्वागत करु, बँक बुडीत चालली असताना आम्ही या बँकेला चांगला नफा मिळवून दिला आहे असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : पोलिसांकडून महिलेवर घृणास्पद अत्याचार, गृहमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -