घरCORONA UPDATELockDown : महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा घोळ सुरुच

LockDown : महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा घोळ सुरुच

Subscribe

महापालिका आयुक्तांना उपरती झाल्यामुळे पुन्हा ही उपस्थिती  ५० टक्के  एवढी आणण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. मात्र, आयुक्तांचे निर्देश असले तरी प्रत्यक्षात ७५ टक्के उपस्थितीचे परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील बिगर अत्यावश्यक विभाग आणि खात्यातील कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांची कोरोना संदर्भातील उपाय योजनांसंदर्भात मदत घेण्यासाठी प्रशासनाने ५० टक्के उपस्थितीचे परिपत्रक रद्द करून १०० टक्के उपस्थिती लागू केली आहे. परंतु महापालिका आयुक्तांना उपरती झाल्यामुळे पुन्हा ही उपस्थिती  ५० टक्के  एवढी आणण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. मात्र, आयुक्तांचे निर्देश असले तरी प्रत्यक्षात ७५ टक्के उपस्थितीचे परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा घोळच असून तुर्तास तरी प्रत्येक दिवशी सर्वच कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे.

 

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना एक दिवस आड याप्रमाणे ५० टक्के उपस्थितीचे परिपत्रक जारी करण्यात आले. परंतु त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचारी सेवेत होते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारीही कामावर येत असल्याने हाताखालील कर्मचारी कामावर येत नसल्याने अखेर नव्या सुधारीत परिपत्रक जारी केले. ज्यामध्ये ज्या कर्मचाऱ्याची उपस्थिती ५० टक्के असेल त्यांना पूर्ण वेतन आणि त्यापेक्षा कमी उपस्थिती असेल तर त्या उपस्थितीच्या दिवसाप्रमाणे वेतन अशाप्रकारे उल्लेख करण्यात आला. त्यामुळे अखेर भीतीने महापालिकेचे कर्मचारी कामावर परतु लागले.

 

- Advertisement -

परंतु, अत्यावश्यक सेवांबरोबरच कोरोनाच्या संदर्भातील उपाययोजनांच्या कामांसाठी अन्य कामगार,कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने १०० टक्के उपस्थितीचे परिपत्रक जारी करण्यात आले. पण हा कर्मचारी वर्ग अधिक असल्याची बाब खुद्द महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना मंगळवारी सर्व विभागांची पाहणी केल्यानंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी ५० टक्के उपस्थितीचा पुनर्विचार करण्याची सूचना सामान्य प्रशासनाला केल्याचे समजते. ५० टक्के उपस्थिती असताना एक दिवस आड याप्रमाणे कर्मचारी योग्यप्रकारे कामावर येत होते. यामुळे योग्यप्रकारे नियोजनही राखले जात होते. परंतु १०० टक्के उपस्थितीच्या परिपत्रकामुळे कामगारांचा गोंधळ उडाला. मुंबई बाहेरील कर्मचाऱ्यांना तीन-तीन तास खर्च करत कामावर यावे लागते. मात्र, पुरेशी वाहनेही उपलब्ध करून दिली जात नाही. तरीही तारेवरची कसरत करत कर्मचारी येत आहे. मात्र, आता पुन्हा जुन्या पध्दतीने परिपत्रक काढण्याऐवजी ७५ टक्के उपस्थितीचे सुधारीत परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे. मात्र,या परिपत्रकावर अद्याप कुणाचीही स्वाक्षरी झालेली  नसल्याचे समजते.

 

महापालिका सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, अजुनही १०० टक्के उपस्थितीच्या परिपत्रकानुसारच कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे ५० टक्के उपस्थितीबाबत अजूनही अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

एक प्रतिक्रिया

  1. Coronavirus-राज्यातील शासकीय कर्मचारी,बँक कर्मचारी यांची प्रवसाच्या दृष्टीकोनातून ते रहात असलेल्या स्थानिक ठिकाणा जवळ ,ते कामावर हजर राहण्यासाठी त्यांची ताबडतोब बदली करावी.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -