घरमुंबईदुसर्‍या यादीत 95 टक्क्यांवरील 43 विद्यार्थी

दुसर्‍या यादीत 95 टक्क्यांवरील 43 विद्यार्थी

Subscribe

राज्य मंडळाचा एकच विद्यार्थी

अकरावी प्रवेशाची सोमवारी जाहीर झालेल्या दुसर्‍या यादीत तब्बल 69 हजार 170 विद्यार्थ्यांची निवड झाली. मात्र दुसर्‍या यादीमध्ये 95 टक्क्यांवरील फक्त 43 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. यामध्ये राज्य मंडळाचा एकमेव विद्यार्थी असून, आयसीएसईचे सर्वाधिक 34 विद्यार्थी आहेत.

अकरावी प्रवेशाची बहुतांश कॉलेजमधील दुसर्‍या फेरीची कट ऑफही 80 टक्क्यांच्यावरच राहिली. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी नामांकित कॉलेजमध्ये असलेली चुरसही कायम राहिली आहे. असे असले तरी पहिला पसंतीक्रम मिळाले नसल्याने दुसर्‍या फेरीमध्ये 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले 43 विद्यार्थी आहेत. यामध्ये आयसीएसईचे 34 विद्यार्थी असून, सीबीएसईचे सात तर एसएससी व आयजीसीएसई बोर्डाचा प्रत्येकी एक विद्यार्थी आहे. राज्य मंडळाने अंतर्गत गुण पद्धत बंद केल्याने यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मोठ्या प्रमाणात घसरला. त्याचा परिणाम अकरावी प्रवेशाच्या यादीमध्येही दिसून येत आहे.

- Advertisement -

दुसर्‍या फेरीमध्ये 95 टक्क्यांवर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य बोर्डाचा फक्त एकच विद्यार्थी आहे. त्यामुळे मुंबईतील नामांकित कॉलेजमधील जागांवर आयसीएसई व सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे दिसून येते. राज्य सरकारने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नामांकित कॉलेजांमध्ये 5 ते 10 टक्के जागा वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी कमी गुणांमुळे या जागांचा फायदाही अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा झाल्याचे दिसून येते.

प्रवेशाच्या दुसर्‍या फेरीमध्ये 90 ते 94.99 टक्के गुण मिळालेले एक हजार 16 विद्यार्थी असून, 85 ते 89.99 टक्के मिळालेले 2 हजार 434 विद्यार्थी आहेत. 80 ते 84.99 टक्के मिळालेले विद्यार्थी सर्वाधिक 4231 आहेत. 80 ते 90 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -