घरमुंबईजग आहे तोपर्यंत समस्या आहेत

जग आहे तोपर्यंत समस्या आहेत

Subscribe

अभिनेता – विजय गोखले…

आर्थिक उलाढाल आणि स्थीरता हवी असेल तर प्रत्येकाला धडपड ही करावी लागते. जसे काम तशी त्याला नावे दिली गेलेली आहेत. व्यवसाय, उद्योग, नोकरी. तसे राजकीय नेत्यांचे क्षेत्र आहे. ज्याला आपल्याला नाव देता येत नाही. आपल्या विजयासाठी तो धडपड असतो, अनेक मुद्दे मांडत असतो, आश्वासन देत असतो ते त्याचे काम काम आहे. त्याला बळी पडायचे की नाही हे आपणच ठरवायला हवे.

- Advertisement -

जग आहे तोपर्यंत समस्या संपतील असे मला वाटत नाही. त्यामुळे कोणते सरकार आले म्हणजे सामान्य माणसाचे प्रश्न सुटतीलच हे ठामपणे आपल्याला सांगता येणार नाही. त्यात काही ना काही त्रुटी या राहातातच. सत्ता हाती आली म्हणजे सरकार चालवणे सोपे आहे. असे म्हणणारा मी नाही. पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, नोकर्‍या अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या प्रत्येकवर्षी सोडवण्याचा प्रयत्न केला तरी पुढच्यावर्षी त्यात आणखीन त्रुटी निर्माण होण्याची शक्यता असते.

यंदा स्वच्छता मोहिमेला जास्त प्राधान्य दिले गेलेले आहे. याचा अर्थ अस्वच्छता पूर्ण नष्ट झाली आहे असे मी म्हणणार नाही पण ज्या सरकारकडून चांगले काम होत आहे त्याला प्रेरणा देण्यासाठी मतदानाशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्यांचे काम साशंक आहे त्याला मत न देणे हेही चुकीचे आहे. त्यासाठी सरकारने नोटाची सुविधा केलेली आहे. मत मोजणीच्यावेळी नोटाची दिसणारी आकडेवारी तुम्ही काय विचार करता हे सांगणारी आहे. तेव्हा मतदान आवर्जून करा असे मी सांगेन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -