घरमुंबईयंदा पावसाळ्यात समुद्रात प्रचंड भरतीच्या लाटांचा इशारा,सर्वात ऊंच लाटा-उधाण कधी येणार?वाचा सविस्तर

यंदा पावसाळ्यात समुद्रात प्रचंड भरतीच्या लाटांचा इशारा,सर्वात ऊंच लाटा-उधाण कधी येणार?वाचा सविस्तर

Subscribe

दाचा पावसाळा जून महिन्यात दाखल होणार 23 ते 28 जून दरम्यान सहा दिवस समुद्रास उधाण येणार आहे. 26 जून रोजी यंदाच्या वर्षी सर्वात मोठी भारती येणार असून 4.85 मीटरच्या लाटा येणार असल्याचे संगितले आहे.

जून महिना जवळ येऊ लागताच मुंबईकरांना वेध लागतात ते पावसाचे . कडाक्याच्या उन्हमुळे वैतागलेले मुंबईकर चातक पक्ष्याप्रमाणे पाऊसाची वाट पाहू लागतात. पण पावसाळा आल्यानंतर सुद्धा त्यांना अनेक प्रश्न,संकट भेडसावत असतात. भर पावसात वाट काढत मुंबईतील नागरिक तुडुंब भरलेल्या पाणथळ रस्त्यावरुन मार्ग काढत कामाचे ठिकाण गाठतात. तसेच आणखी एक भली मोठी समस्या नागरिकांना भेडसावत असते ती मोठ्या भारतीच्या लाटांची. यंदा संपूर्ण पावसाळ्यात 18 दिवसांचा कालावधी हा मोठ्या भरतीचा कालावधी ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर अधिक वाढणार असून या महिन्यात 10 दिवसांत भारतीचा जोर जास्त राहणार आहे.मुंबई पालिकेकडून दरवर्षी पावसाच्या घडामोडीचा अंदाज घेतला जातो. त्यात भारतीचे दिवस कोणते,लाटांची ऊंची किती या सर्व घडामोडींचा आढावा घेण्यात येतो. तसेच अतिवृष्टीवेळी अचानक घडणार्‍या प्रसंगांना तोंड देण्यासाठी पालिकेकडून नियोजन केले जाते. त्या अनुषंगाने पालिकेच्या आपत्कालीन विभागाने मुंबईत मोठी भरती कधी असेल, याचा आढावा घेण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात १८ दिवस सर्वात मोठी भरती येणार असून त्यावेळी साडेचार मीटरपेक्षाही अधिक उंचीच्या लाटा येण्याची शक्यता मांडण्यात आली आहे , असा अंदाजदेखील आपत्कालीन विभागाने दिला आहे.

यंदाचा पावसाळा जून महिन्यात दाखल होणार 23 ते 28 जून दरम्यान सहा दिवस समुद्रास उधाण येणार आहे. 26 जून रोजी यंदाच्या वर्षी सर्वात मोठी भारती येणार असून 4.85 मीटरच्या लाटा येणार असल्याचे संगितले आहे.

- Advertisement -

पालिकेने दिलेल्या अहवाला नुसार भरतीचे दिवस पुढील प्रमाणे-

तारीख   वेळ   लाटांची ऊंची
२३    ११.३७   ४.५९ मीटर

- Advertisement -

२४   १२.२४   ४.७१ मीटर

२५   १३.०७   ४.७३ मीटर

२६   १३.४८   ४.६८ मीटर

२७   १४.२७   ४.५५ मीटर

ऑगस्ट  वेळ    लाटांची उंची

१०   १३.२२   ४.५० मीटर

११    १३.५६   ४.५१ मीटर

२२    १२.०७   ४.५७ मीटर

२३    १२.४३   ४.६१ मीटर

२४   १३.१७   ४.५६ मीटर

सप्टेंबर  वेळ    लाटांची उंची

८     १२.४८   ४.५६ मीटर

९     १३.२१   ४.५४ मीटर


हे हि वाचा – साथीचे रोग अन् मुंबईच्या रेल्वे स्टेशनचे १२५ वर्षांचे कनेक्शन

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -