घरताज्या घडामोडीभाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन

भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन

Subscribe

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी रोखठोक भूमिका मांडणार्‍या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी सुरुवातीला दबक्या आवाजात मंत्री राठोड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, वाघ यांनी थेट सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांसमोर येऊन संजय राठोड यांचे नाव घेतले होते. त्यानंतर या प्रकरणावरुन त्यांना आता धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे

धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही. त्यामुळे उगाच मला फोन करून वेळ वाया घालवू नका. माझ्या भावड्यांनो, असे प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी ट्विटरवर दिले आहे.

- Advertisement -

राजसत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत, असे चित्रा वाघ ट्विटरवर म्हणाल्या.

राजसत्ता पाठीशी असल्यानेच तर कर असली तरी डर कशाला? ही मानसिकता बळावली आहे. राजदंडाचे अभय मिळाले आणि सामाजिक न्याय अबाधित राहिले. पूजा चव्हाणला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, तिच्यावर अत्याचार केले, त्यालाही कदाचित असेच अभय मिळेल?, असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवर केला आहे.

- Advertisement -

माझ्या मुलीचा मृत्यू आर्थिक विवंचनेतून 
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बातचित करताना त्यांनी माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचे कारण तिच्यावर असलेले कर्ज होते, असेही पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -